पंढरपूर (प्रतिनिधी) - खवा बाजारातील अर्बन बँकेच्या कर्मयोगी सभागृहात पुणे येथील सुप्रसिद्ध मुक्त पत्रकार, लेखिका, सायबर व समाज माध्यम यांच्या अभ्यासिका मा. मुक्ता चैतन्य यांचे "बदलत्या काळातील डिजिटल आव्हाने" या विषयावरील अभ्यासपूर्ण व्याख्यान रविवार दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.
डिजिटल माध्यम शिक्षण का हवं...., मुलांचा स्क्रीन टाईम कसा कमी करायचा ?, मुलींची ऑनलाइन सुरक्षा, अशा विविध विषयांवर व्याख्यात्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. पंढरपुरातील सर्व पंधरा वर्षावरील मुला-मुलींनी याचा अवश्य लाभ घ्यावा.
कार्यक्रम स्थळी मुक्ता चैतन्य यांची पुस्तके विक्रीस उपलब्ध असणार आहेत. तरी सर्वांनी या व्याख्यानाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन सुवर्ण तारका ग्रुपचे वतीने करण्यात येत आहे.