पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांना सर्वाधिक मताधिक्य देणार - भगिरथ भालके

0
कासेगाव सभेत भगिरथ भालके यांनी विरोधकांवर केला प्रहार


        पंढरपूर (प्रतिनिधी) - कासेगाव येथील महामाया मंदिर पटांगणात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा माजी मंत्री आमदार सतेज पाटील, आमदार अमित देशमुख, युवा नेते भगीरथ दादा भालके व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

        यावेळी बोलताना श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची माजी चेअरमन, युवा नेते भगीरथ दादा भालके म्हणाले- पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रणितीताई शिंदे यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
       पुढे बोलताना भगिरथ भालके म्हणाले की - प्रचाराच्या निमित्ताने आज ही सभा आयोजित केली आहे. आमच्या ताईंनी कासेगावातल्या वडीलधाऱ्यांना नागरिकांना सांगितलं होतं की भगीरथला घेऊन आम्ही कासेगाव येथे मोठी सभा घेऊ आणि मोठ्या बहिणीने दिलेलं वचन पूर्ण करण्याची जबाबदारी छोटा भाऊ म्हणून त्या ठिकाणी माझ्यावरती आहे; म्हणून मी सांगितलं या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पहिली मोठी सभा कासेगाव नगरीत झाली पाहिजे म्हणून या ठिकाणी सभा घेतली आहे.  सर्वसामान्य शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, बेरोजगार तरुणांची, विविध प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी तसेच लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी, पंढरपूर मंगळवेढा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही खंबीरपणे आमदार प्रणिती शिंदे यांच्या पाठिशी  उभे राहणार आहोत.  आपण येत्या  ७ में रोजी मतदान रुपी  आशीर्वाद देऊन प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन भगिरथ भालके यांनी यावेळी केले. तसेच विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळी विरोधकांनी केलेल्या टिकेचा खरपूस समाचार त्यांनी यावेळी घेतला. नाव न घेता विरोधकांची वृत्ती रावणासारखी झाल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षाचे उमेदवार व भाजपावर त्यांनी आपल्या भाषणात जोरदार टिकेची झोड उठवली. विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता, गट-तट-पक्ष यांचा विचार न करता सगळ्यांनी प्रणितीताई शिंदे यांना मतदान करण्याचे आवाहन यावेळी भगीरथ भालके यांनी आपल्या भाषणातून केले. यावेळी महाविकास आघाडीचे व कॉग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते, कै.भारत भालके प्रेमी शेतकरी, कष्टकरी, महिला, युवा, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     युवा नेते भगीरथ भालके यांनी त्यांच्या भाषण शैलीतून केलेल्या घनाघाती भाषणामुळे लोकसभेच्या रणधुमाळीत विधानसभेची तयारी सुरू असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)