चि. वरद व कु. सृष्टी बडवे यांनी केले पर्यावरण जनजागृतीचे काम

0
सर्व नागरिकांनी पशु-पक्षांना पाणी ठेवण्याचे केले आवाहन

          पंढरपूर (प्रतिनिधी) - पर्यावरणाचे काम करणारे वरद बडवे व सृष्टी बडवे हे गेले अनेक वर्षे पशु पक्षांना पाणी ठेवणे, चारा ठेवणे हे काम करीत आहेत व आपल्या यूट्यूब चैनल मार्फत ही जनजागृती करत आहेत, मध्यंतरी वरद कॉलेजच्या परीक्षासाठी गेला असता त्याला उन्हाचा थोडा त्रास झाला, आपल्याला त्रास उन्हाचा होतो तर पशुपक्ष्यांना किती होत असेल याची जाणीव वरदला झाली. तसेच गल्लीतील एक दोन चिमण्या उन्हामुळे मरून पडल्या, आता इतर चिमण्यांना वाचवण्यासाठी दोघे बहिण-भावाने ठरवले, आपण याची जनजागृतीचे बॅनर व पाणी पिण्यासाठी मातीचे भांडे व सर्वांना एक विनंती करूया की पक्षांना पाणी ठेवा.
          त्याप्रमाणे श्रीस्वामी समर्थ प्रकट दिनाचे औचित्य साधून प्रथमच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या व भगवान श्रीपांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन व मातीच्या भांड्याचे पूजन पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक  श्री. विश्वजीत घोडके साहेब व ह. भ. प. रामकृष्ण वीर महाराज यांच्या हस्ते श्रींचे पूजन करण्यात आले व पर्यावरण जनजागृतीचा बॅनर व मातीचे भांडे विविध मान्यवरांना देण्यात आले.
 🌳 आदरणीय श्री. घोडके साहेब यांनी पण शहर पोलीस स्टेशन येथे पक्षांना पाणी पिण्यासाठी मातीचे भांडे लावू असे आश्वासन दिले. व वरद, सृष्टी यांना पर्यावरणाचे जे काम करत आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक व त्यांना आशीर्वादही दिला. या  कार्यक्रमांमध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते.
          पर्यावरण जनजागृतीसाठी  सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती वरद व सृष्टी यांनी  केली.
       जनजागृतीसाठी केलेल्या बोर्डावर "जल है तो कल है",  "एक पेड देश के नाम", "थेंब थेंब वाचवा पाण्याचा हाच मार्ग सुखी भविष्याचा", "आपल्या नद्या मंदिरे गडकोट स्वच्छ व पवित्र ठेवूया", "झाडे लावा झाडे जगवा", "चला जल जमीन ऊर्जा पेड जीव यांचे संरक्षण करूया", "आपला परिसर स्वच्छ ठेवा निरोग रहा" अशा विविध प्रकारच्या जनजागृती स्लोगनही लावण्यात आले होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)