तुमच्या समस्या नाही सोडवल्यास माझा कान पकडा – प्रणिती शिंदे

0
           मोहोळ (प्रतिनिधी) - सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या मोहोळ तालुका दौऱ्यावर आहेत. ही निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी महत्त्वाची आहे. तसेच मागील दहा वर्षाच्या काळात मतदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठीच मी आपल्यापर्यंत आले असून या वेळेस काँग्रेसला निवडून द्या आणि आपल्या समस्या, अडीअडचणी नाही सोडवल्या, तर माझे कान पकडा, अशा शब्दात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदारांना आवाहन केले. सोमवारी प्रणिती यांनी मोहोळ तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्या बोलत होत्या. 
          प्रणिती शिंदे म्हणाल्या, भाजपने मागील १० वर्षात काहीच काम केले नाही. महागाई प्रचंड वाढली आहे. बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. पाणीप्रश्न सोडवण्यात भाजप अपयशी ठरली. दुधाला भाव नाही. खतांचे दर दुप्पटीने वाढले आहेत. जीएसटीने सर्वसामान्य जनता मेटकुटीला आली आहे. चारा छावण्या बंद आहेत. यांनी चारा छावण्याची मागील बिले देखील अदा केलेली नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर आता चारा छावण्या सुरू करण्यात येतील, असे आश्वासन देत आहेत. मात्र भाजप फक्त आश्वासन देते. अंमलबजावणी होत नाही. 

          प्रणिती यांनी आज मोहोळ तालुक्यातील यावली, तावशी, चिखली, वडाचीवाडी, हिवरे, देवडी, वाफळे, शेटपळ, आष्टी, खंडाळी, पापरी, येवती, कोन्हेरी, पोखरापूर, तांबोळे, सौंदणे या गावाला भेटी दिल्या. या भेटी दरम्यान, प्रणिती यांनी महागाई, बेरोजगारी, पाणीप्रश्न या मुद्यावरून भाजप सरकारवरून टीकेची झोड उठवली. यावेळी ... सीमा पाटील, अशोक भोसले सुलतान तांबोळी, शिवसेनेचे महेश देशमुख, राजेश पवार, खांडेकर काका, शाहीन शेख मॅडम, दाजी खांडेकर, संदीप पाटील, तुकाराम माने, सत्यवान देशमुखआदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)