प्रणिती शिंदे यांनी घेतले हिंगुलांबिका मातेचे दर्शन

0
 

         सोलापूर (प्रतिनिधी) - सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आज हिंगुलांबिका माता प्रकटदिनी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. देवीचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले असल्याची भावना यावेळी प्रणितीताई शिंदे यांनी व्यक्त केली. 
       यावेळी आमदार प्रणितीताई शिंदे यांनी दिवसाची सुरुवात ही गणेश पेठेतील हिंगुलांबिका मातेचे दर्शन घेऊन केली. यावेळी त्यांनी देवी मातेची मनोभावे आरती केली. दरम्यान सोलापूरकरांची दुष्काळापासून सुटका होऊ दे,  चांगले पर्जन्यमान व्हावे, शेतकऱ्यांच्या समस्या सुटून त्यांना चांगले दिवस यावेत, असे साकडेही देवी मातेकडे घातले. 
        यावेळी प्रणिती शिंदे यांच्यासोबत मंदिर समितीचे अध्यक्ष किशोर कटारे, सुशात अंबुरे, श्रीकांत अंबुरे, विजय पुकाळे, किसान गर्जे, दत्तात्रय पुकाळे, राजकुमार हंचाटे, सुर्यकांत महिंद्रकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)