पुणे (प्रतिनिधी) - घराकडुन कामावर येताना व जाताना आपली घरी कोणीतरी वाट पहात आहे; याची जाणीव ठेऊन काम सुरक्षित करावे, वाहन चालकांनी अपघात प्रसंगी आपणास आणि ईतरानां 108 रुग्णवाहिकेची मदत घ्यावी, सफाई कामगारांनी आपल्या आरोग्याच्या सुरक्षा साठी मास्कचा वापर करावा असे डॉ.जयपाल पाटील यांनी सांगितले. आय.बी. विश्रामगृहातील कर्मचारी व वाहन चालक आपत्तीव्यवस्थापनचे प्रशिक्षण त्यांनी दिले..
प्रारंभी अधिकारी श्री. लक्ष्मीकांत कावडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी एस्टीम टुडेचे संपादक संजय जोशी, अदिवासीसेविका सविता मते, पोलीस निरीक्षक माधुरी जाधव उपस्थित होते. डाॅ.जयपाल पाटील यांचा परिचय आणि जीवनात आपत्कालीन परिस्थितीत नेमके काय करावे हे प्रत्त्येक नागरिकाला माहित असले पाहिजे ते महान कार्य पाटलांचे देशभरात सुरू आहे. अपघात वेळी 108 रुग्णवाहिकेसाठी पुणे जिल्हा प्रमुख डाॅ. प्रियंक जावळे यांस दूरध्वनी करताच डॉ. वैभव ईचके व पायलट सुनील चव्हाण हे 20 मिनिटात पोहचून कसा लाभ घेणे याची माहीती दिली. महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस 112 चा वापर कायम करावा यासाठी फोन करताच बंडगार्डन पोलीसठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान पवार यांनी बीटचे अंमलदार धुळगुडे, पो.ह.शहाजी ढवाळ यांना पाठविले ते 10 मिनिटात येऊन त्यांनी सुरक्षेबाबत माहिती दिली. तसेच घरातील गॅस, गिझर, आपली वाहने परवाना नसताना चालविण्यास दिली आणि अपघात झाला तर कोणती आपत्ती येते याची माहिती दिली. या आपत्ती व्यवस्थापनात कर्मचारी व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील आमदार, सरकारी अधिकाराचे वाहन चालकांनी लाभ घेतला.