पंढरपूर (प्रतिनिधी) - जगत ज्योती महात्मा बसवेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सकल लिंगायत समाज टाकळी रोड यांच्या वतीने समाज मंदिर श्रीराम नगर टाकळी रोड पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली. यावेळेस पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री निलराज डोंबे टाकळी गावचे सरपंच संजय साठे, टाकळी ग्रामपंचायत सदस्य संदीप मांडवे, ह.भ.प श्री हरी कोरे सर, पंढरपूर बडोदा बँकेचे शाखा अधिकारी श्री अण्णारय कोरे, ज्येष्ठ समाजसेवक श्री सुभाष खटावकर, श्री श्याम गोगाव सर, समाजसेवक सुरज पावले, टाकळी गावची पोलीस पाटील श्री गजानन इरकर सर आधी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रतिमापूजन पंढरपूर नगरपालिका नगरसेवक निलराज डोंबे व व सरपंच संजय साठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस ह. भ. प. श्री. हरी कोरे सर यांनी महात्मा बसवेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज दोन महापुरुषांमधील असणारा साम्य व त्यांचे थोर असे कार्य यांच्याबद्दल आपल्या व्याख्यानातून प्रबोधन केले यावेळेस टाकळी रोड पंढरपूर या भागातील अनेक लिंगायत समाज बांधव व भगिनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.
हा कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी श्री. सिद्धेश्वर कोरे, श्री. राजू म्हमाणे, श्री. राहुल म्हमाणे, स्वामी महाराज बिर्गीकर, श्री. नागेश कुंभार, श्री. प्रशांत यावगल, श्री. दत्तात्रेय धोत्रे डॉक्टर, नकाते, श्री. भार्गव शेटे, श्री. योगेश कटप, श्री. नाना हिंगमिरे, सौ. कविता राजमाने मॅडम व इतर सर्व वीरशेव समाज बंधू आणि भगिनी आदींनी परिश्रम घेतले.