नदीकाठचा विद्युत पुरवठा रोज किमान 8 तास सुरळीत चालु ठेवावा - चेअरमन, कल्याणराव काळे
पंढरपूर (प्रतिनिधी) दि. 24 - पंढरपूर तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसामुळे द्राक्ष, डाळींब, केळी, इ.बागांचे अतोनात झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी तसेच भिमानदीकाठच्या गावांचा रोज किमान 8 तास विद्युत पुरवठा सुरळीत करुन मिळावा अशी मागणी सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्र्वादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांनी उपविभागीय आधिकारी, पंढरपूर यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
पंढरपूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा व वादळी वाऱ्यामुळे शेतकरी व नागरीकांना फार यांचे अतोनात नुकसान झालेले असून उन्हाळयात जोपासलेली शेतातील उभी पिके डोळया देखत भुईसपाट झालेली आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे या भागातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून वाडया-वस्तीवर राहणारे नागरीक यांच्याही घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे त्यांचे संसार उघडयावर पडलेले आहेत. तरी सर्वांचे त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश देवून त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच उजनी जलाशयातून भिमानदीत सोलापूर शहराकरीता सोडलेल्या पाण्यामुळे तालुक्यातील नदीकाठच्या गावांचा विद्युत्त पुरवठा बंद केलेला आहे. त्या अनुषंगाने दि.23/05/2024 रोजीच्या मा.जिल्हाधिकारी यांनी गुरसाळे या को.प.बंधाऱ्यावरील विद्युत पुरवठा हा (तीन आठवडे) करीता एक दिवसाआड 8 तास चालु ठेवणेबाबत कळविले आहे. त्याऐवजी रोजच किमान 8 तास विद्युत पुरवठा सुरळीत (विनाखंडीत) मिळावा जेणेकरुन या भागातील लोकांचा व जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे असेही निवेदनात काळे यांनी म्हटले आहे.
यावेळी सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळूंखे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे व्हा.चेअरमन हरिदास मुजमुले, सहकार शिरोमणीचे संचालक मोहन नागटिळक, जयसिंह देशमुख, राजसिंह माने, परमेश्वर लामकाने, संतोष भोसले, अमोल माने, अरुण नलवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर तालुका अध्यक्ष अनिल नागटिळक, जिल्हा कार्यकारणी सदस्य नारायण शिंदे, अर्जुन जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव अशोक भिंगारे, भारत गाजरे यांचे सह विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.