पंढरपूर (प्रतिनिधी) - वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था धोंडेवाडी येथील 50 विद्यार्थ्यांची एल अँड टी कंपनीत नोकरीसाठी निवड झाली आहे शनिवार दि.17 मे 2024 रोजी एल अँड टी कंपनीचे एच आर हेड, एस. नंदकुमार, सी एस टी.कांचीपुरम,व एस नागराजन यांनी, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन,यांत्रिक मोटार गाडी या व्यवसायातील प्रशिक्षणार्थीची धोंडेवाडी येथे आयटीआय कॉलेजमध्ये येऊन मुलाखत घेतली व मुलाखतीनंतर एल अँड टी कंपनी मध्ये 50 प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली.
या निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रम प्रसंगी आयटीआय कॉलेजचे प्राचार्य संतोष गुळवे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची संधी या संस्थेमध्ये उपलब्ध करून दिल्याने व महाराष्ट्र व भारत देशातील नामांकित कंपन्यांचे एचआर हेड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतच कॅम्पस इंटरव्यू साठी येत असल्याने शेकडो मुलांना नामांकित कंपनीतील रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे व ग्रामीण भागातील विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहणेची संधी संस्थेच्या माध्यमातुन दिली जात आहे. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थीचे संस्थेचे अध्यक्ष मा.कल्याणराव काळे, यांनी अभिनंदन केले. या वेळी आय टी आय कॉलेजचे प्राचार्य संतोष गुळवे सर व सर्व निदेशक यांनीही निवड झालेल्या प्रशिक्षणार्थीचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.