भाळवणीत प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकरी संतप्त

0
          पंढरपूर (प्रतिनिधी) - निरा उजवा कालवा वरील भाळवणी शाखा क्रमांक 2 वर प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकरी प्रचंड संतप्त झाला असुन शेकडो शेतकऱ्यांनी फळवणी चौकी ९१ मैल येथे सकाळपासून आंदोलन सुरु केले आहे.
         भाळवणी शाखा क्रमांक 2 वर एकुण  17 पाणी वापर संस्था असून सर्वांना उन्हाळा हंगामासाठी कोटा निश्चित करून दिलेला असताना देखील 8 तारखेपासून मुख्य कॅनाल कोरडा पडलेला आहे.
       शेतकऱ्यांनी शाखा अभियंता चक्के यांना घेराव घातलेला असुन पाणी येउद्या तरच तुम्हाला सोडतो अशी आक्रमक भुमिका सर्वांनी घेतली आहे. 

         वेळापुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रेगुडे यांनी आचारसंहिता असल्याने आंदोलन करता येत नाही म्हणून समजुत घालण्याचा प्रयत्न केला तरी संतप्त शेतकऱ्यांनी वरीष्ठ अधिकारी यांना बोलावून कशा पद्धतीने आमचे इरिगेशन होणार आहे. हे स्पष्ट करा अन्यथा आम्ही जागा सोडणार अशी ठाम भूमिका घेतली आहे.

         यावेळी नागेश काकडे, दिपक पवार, सुरेश देठे, विजय पवार, दिपक गवळी, विजय शिंदे व शेकडो शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)