मोदी सरकार बद्दल जनतेत प्रचंड चिड

0
मतदारांनी निवडणूक हाती घेतली

राज्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय निश्चित-पटोले

            सोलापूर (प्रतिनिधी) -  मतदारांना मोठमोठी आश्वासंन देत भुलथापा देवुन,फसवणुक करुन  मोदी सरकार 10 वर्षे सत्तेत असुन शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, महिलांचा भ्रमनिरास झाला आहे, महागाईने जनता त्रस्त झाली, याची प्रचंड चिड मतदारात असुन याचा राग मतदानातुन व्यक्त करून मोदी सरकार हद्दपार करतील देशात इंडीया सरकार सत्तेत येईल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला .
          सोलापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारार्थ तिर्हे येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.यावेळी आमदार डॉ मिर्झा जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी आमदार दिलीपराव माने, शहराध्यक्ष चेतन नरोटे, पल्लवी रेणके, वसीम पठाण, विजय हत्तुरे, जिल्हा काँग्रेस कमेटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष भारत जाधव, तालुका अध्यक्ष शालीवाहन माने, महिला अध्यक्षा सुरेखा पाटील, सरपंच गोवर्धन जगताप, भास्कर सुरवसे, अजय सोनटक्के, नेताजी सुरवसे आदि मान्यवर उपस्थित होते.
           काँग्रेस सत्तेत असताना श्रीमंताचे पैसे घेऊन गरीबांना दिले जायचे, मोदी सरकार गरीबांचे पैसै अदानी, अंबानी या श्रीमंताना देत असल्याचा आरोप केला. तर हा टेलर होता असे मोदी सांंगतात भविष्यात जनतेला कोणता सिनेमा दाखवणार हे लक्षात घ्या, हुकुमशाही, तानाशाही, जुमलाशाही, जाती-धर्मात तेढ निर्माण करणारे मोदी सरकार विरोधात प्रचंड चिड निर्माण झाली असुन मोदी सरकार हद्दपार करण्यासाठी ही निवडणूक मतदारानींच हातात घेतल्याने देशात इंडीया आघाडीचे सरकार येईल व सोलापूर मतदारसंघात उत्साह पहाता प्रणिती शिंदेचा विजय निश्चीत असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

         प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सुशीलकुमार शिंदे यांनी मोठ्या मनाने मला काँग्रेस पक्षात प्रवेश दिला, पक्षात प्रवेश केल्यानंतर मी  जिद्दीने व जबाबदारीने प्रणितीताई शिंदे यांच्या विजयासाठी गावभेट दौरा, काँर्नर बैठकाच्या माध्यमातून मतदाराशी संपर्क करीत असुन मतदाराचा प्रंचड प्रतिसाद पहाता प्रणितीताई शिंदे यांचा विजय निश्चित आहे. मात्र कार्यकर्त्यांनी गाफील राहु नये, व अफवेवर विश्वास ठेवु नका.असे माजी आमदार दिलीपराव माने यांनी सांगुन राज्यात विरोधकांना  पराभव दिसत असल्याने पंतप्रधानानी सभेचा सपाटा लावला आहे तरीही राज्यात महाविकास आघाडीच वरचढ ठरणार असल्याचे माने यांनी सांगितले.
        यावेळी तिर्हे गावातील व परिसरातील नागरीक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक बाळासाहेब सुरवसे यांनी केले.

 ▪️लांडगा आला रे आला अशी गत मोदीची होणार....

          काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी लांडगा आला रे आला ही गोष्टीचा दाखला दिला. लोकांना लांडगा रे आला सांगत लोकांना फसवत आसलेला राखणदार खरेच लांडगा आलेवर ओरडला मात्र लोकांनी विश्वास ठेवला नाही यावेळी मोदीची गत होणार आहे.सतत भुलथापा, अच्छे दिन आणेवाले सांगत फसवणा-या मोदीवर यावेळी कितीही गँरटी दिली तरीही मतदार फसणार नाहीत. असे सांगताच उपस्थितीनी  टाळ्याचा कडकडाट केला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)