स्वेरीच्या डिप्लोमा महाविद्यालयात सदर सुविधा उपलब्ध
पंढरपूर (प्रतिनिधी) - गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.) क्र.- ६४३७ ची मान्यता मिळाली असून बुधवार, दि. २९ मे २०२४ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया मंगळवार, दि. २५ जून २०२४ पर्यंत चालणार आहे,’ अशी माहिती डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांनी दिली.
सन २०२४-२५ करीता डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, भरलेले अर्ज स्विकारुन प्रमाणपत्रे, कागदपत्रांची तपासणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा.संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांचे अधिकृत केंद्र (एफ.सी.क्र.-६४३७) म्हणून स्वेरीच्या डिप्लोमा महाविद्यालयास मान्यता दिली आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन, पालकांचा होणारा संभ्रम, संबंधीत कागदपत्रे जमविताना होणारी अडचण व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केले असून यंदाचे हे डिप्लोमा इंजिनिअरिंगचे १६ वे वर्ष आहे. स्वेरीच्या डिप्लोमा महाविद्यालयाने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. ही प्रकिया दि. २९ मे २०२४ पासून ते दि. २५ जून २०२४ सायं. ५ वाजेपर्यंत चालणार आहे. याचा लाभ दहावी मधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घेण्याचे आवाहन केले आहे. या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे. डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रा.एस.एस.गायकवाड (मोबा.क्र.९८९०५६६२८१) व प्रा.एम.एम.मोरे (मोबा.क्र.९४२१९६०२५८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ यांनी केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली डिप्लोमा इंजिनिअरिंग फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.