सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक
पंढरपूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते आणि रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंढरपूर शहर तालुक्यातील महायुतीच्या विविध घटक पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पंढरपूर शहरातील हॉटेल विठ्ठल इन येथे आयोजित केली होती.
या बैठकीमध्ये महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.
महायुतीतील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते यांनी दोन्ही मतदारसंघातील प्रत्येक घरोघरी जाऊन महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.
यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य प्राध्यापक चांगदेव कांबळे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख महेश साठे, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष काशिनाथ थिटे, बाबासाहेब बडवे, शिरीष कटेकर, सरचिटणीस बादल ठाकूर,भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्राजक्ता ताई बेणारे, मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, शहराध्यक्ष संतोष
कवडे, मनसे शहर संघटक गणेश पिंपळनेरकर, मनसे उपजिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर गरड, मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष प्रताप भोसले, शहराध्यक्ष अवधूत गडकरी, मनसे विभाग अध्यक्ष नागेश इंगोले, मनसे सहकार सेना जिल्हाध्यक्ष कृष्णा मासाळ, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष वर्षाताई शिंदे, आरपीआय आठवले गटाचे नगरसेवक डी राज सर्वगोड, आदित्य जोशी, युवा सेना शहर प्रमुख सुमित शिंदे, विवेक बेणारे, महेश खिस्ते, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके, संकेत ढवळे, अमोल पर्वतराव युवक शहराध्यक्ष, शुभम शिरकर विद्यार्थी परिषद शहराध्यक्ष, रशीद शेख,
साधनाताई राऊत ओबीसी महिला अध्यक्ष, उपजिल्हाप्रमुख युवा सेना साईनाथ बडवे, शहर संघटक युवासेना सनी असंगे, शहर उपप्रमुख युवा सेना महबूब नदाफ, शहर उपप्रमुख युवा सेना आनंद शिंदे, शहर उपप्रमुख युवासेना
गणेश चव्हाण, युवा सेना कॉलेज कक्ष तालुकाप्रमुख करण नागणे, युवा सेना तालुकाउपप्रमुख विश्वजीत नागटिळक, डॉ. प्राजक्ता बेणारे, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सोलापूर ग्रामीण डॉ. जोती शेटे, शहराध्यक्ष भारतीय जनतापार्टी महिला मोर्चा पंढरपूर शहर सौ. अपर्णा तारके , उपाध्यक्ष
सौ. सुजाता वगरे, उपाध्यक्ष जिल्हा कार्यकारणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सौ. सुप्रिया काकडे, जिल्हा सरचिटणीस आणि सोशल मीडिया प्रमुख भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सौ. सरिता मुडे, सरचिटणीस जिल्हा कार्यकारणी महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी अंजना जाधव, चिटणीस जिल्हा कार्यकारणी महिला मोर्चा
सौ. शिल्पा म्हमाणे, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पंढरपूर शहर
सौ. मेघा मोळक, संघटन सरचिटणीस महिला मोर्चा पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टी यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथराव शिंदे गट, राष्ट्रवादी अजित दादा पवार गट, आरपीआय आठवले गट, रासपा, लहुजी शक्ती सेना या विविध महायुतीच्या संघटनांचे पदाधिकारी इत्यादी उपस्थित होते.