कर्मयोगी अभियांत्रिकीमध्ये रोहन परिचारक यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

0
२१० जणांचे रक्तदान, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
 
             पंढरपूर (प्रतिनिधी) - श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन रोहन परिचारक मालक यांचा वाढदिवस कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालय शेळवे येथे विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यामध्ये रक्तदान, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 
            रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानून २४ मे रोजी कम्प्युटर सायन्स विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने  रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपली सामाजिक जबाबदारी ओळखून महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी यांनी या कार्यक्रमास उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यामध्ये सुमारे २१० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यासाठी पंढरपूर ब्लड बँक व अक्षय ब्लड बँक पंढरपूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
त्यानंतर दुसर्‍या दिवशी प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागातर्फे प्रथम वर्षामध्ये विद्यापीठाच्या परीक्षेमद्धे प्रत्येक प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पारितोषिक देण्यात आले.  
           सदरच्या सर्व कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. कणसे, रजीस्ट्रार श्री. जी. डी. वाळके, उप प्राचार्य प्रा. जे. एल. मुडेगावकर,  संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, तसेच विभागप्रमुख प्रा. अभिनंदन देशमाने, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. अनिल बाबर, प्रा. एस. एम. लंबे, प्रा. दीपक भोसले , प्रा. गणेश बागल तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)