न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए. पंढरपुरला नॅक मानांकन

0
          पंढरपूर (प्रतिनिधी) - येथील न्यु सातारा समुह मुंबई, संचालित न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए. कोर्टी-पंढरपुर या महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) स्वायत्त संस्था नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रेडिटेशन काऊन्सिलची (NAAC)  राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद (NAAC) तर्फे  “बी” ग्रेड प्राप्त झाली. 
                                                      
        न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए. कोर्टी, पंढरपुर येथे  NAAC तर्फे तीन सदस्य कामिटीद्वारे दि. २७ व २८ एप्रिल २०२४ रोजी तपासणी करण्यात आली होती. सदर दोन दिवसीय तपासणी मध्ये NAAC च्या एकूण सात क्रायटेरीयाची कागदपत्रे व फाईलस तपासणी करण्यात आली. तसेच माजी विद्यार्थी व पालक याच्याशी देखील कमिटीने चर्चा व माहिती सत्यता पाहून चालू विद्यार्थ्यांची देखील संवाद साधला. तसेच महाविद्यालयाकडून विद्यार्थ्याना दिल्या जात असलेल्या अकॅडेमिक सुविधा व शैक्षणिक गुणवत्ता व पुरविण्यात येणाऱ्या भौतिक सुविधा , तसेच विद्यार्थी प्लेसमेंट याची देखील सखोल कागदपत्रे पाहून सत्यता पडताळणी केली. महाविद्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठ, सोलापुर संलग्नित बी.सी.ए. हा एकमेव डिग्री कोर्स चालविला जात असुन देखील महाविद्यालयास मिळालेल्या NAAC ग्रेडचे सर्वत्र कौतूक होत आहे.  

                        हे कार्य यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तंटक एन.एन., संस्था प्रतिनिधी मा.शेडगे डी.डी., उप-प्राचार्य व IQAC को-ओर्डीनेटर प्रा.ताठे पी.बी. व सर्व प्राध्यापक व नॉन टीचिंग कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. सदर NAAC कामकाजामध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.राजाराम (नाना) निकम व संचालक डॉ.लक्ष्मीकांत निकम याचे विशेष मार्गदर्शन लाभले व त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)