पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या पाच कंपन्या, नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) कमांडो, ड्रोन आणि 'स्नायपर्स' तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, परदेशी पाहुणे राजधानीतील लीला, आयटीसी मौर्य, ताज, ओबेरॉय आणि क्लेरिजेस हॉटेल्समध्ये थांबणार आहेत. यामुळे हे हॉटेल्स देखील सुरक्षेच्या कक्षेत घेण्यात आले आहेत.
शपथविधी सोहळ्याच्या दिवशी राष्ट्रपती भवन आणि विविध महत्त्वाच्या ठिकाणी दिल्ली पोलिसांचे स्वॅट आणि एनएसजी कमांडो तैनात असतील. शपथ विधी समारंभ राष्ट्रपती भवनात होणार असल्याने या परिसरात आणि बाहेर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था असेल.