कलापिनी संगीत विद्यालयाची आदर्श परंपरा
पंढरपूर (प्रतिनिधी) - भारतासह जगभरात संगीत क्षेत्रात शेकडो विद्यार्थी घडविणाऱ्या पंढरपूर येथील कलापिनी संगीत विद्यालयाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अंध, अपंग, अनाथ, निराधार लोकांना संपूर्ण मोफत संगीत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. १९७८ सालापासून संगीत कलेचे उच्चस्तरीय संगीत शिक्षण देत असणाऱ्या या संस्थेत आजपर्यंत जवळ जवळ ५००० हुन अधिक विद्यार्थी या संस्थेत घडले आहेत. सामाजिक जाणीव जपताना वृक्षरोपण, गडसंवर्धन, ग्रामीण संगीत कला विकास, महिला शिक्षण, ग्रामस्वच्छता अभियान, शास्वत ग्रामीण विकास कार्यक्रम आदी विषयावर या संस्थेचे निरंतर कार्य चालू असते. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई संस्था नोंदणी अधियम कायदा १८६० व १९५०, भारत सरकारची सी एस आर आदी विभांगाशी हि संस्था संलग्न आहे.
समाजात अंध, अपंग, निराधार असलेल्या व संगीत कला शिकू इच्छिणाऱ्यानी याचा फायदा करुन घ्यावा असे अवाहन दादासाहेब पाटील, विकास पाटील व प्रियंका पाटील यांनी केले आहे.