आपटे उपलप प्रशालेत दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न

0
          पंढरपूर (प्रतिनिधी) - विद्या विकास मंडळ पंढरपूर संचलित आपटे उपलप प्रशाला पंढरपूर येथे दहावा जागतिक योग दिन संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख अभ्यागत म्हणून  योगशिक्षक श्री . चिंतामणी दामोदरे सर व त्यांची सुवर्णपदक प्राप्त योगपटू  आठवीतील कु. मिताली  हावड यांनी प्रात्यक्षिके करून दाखविली तसेच सर्वांकडून करून घेतली.
         प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय धारूरकर  यांनी योग दिनाचे महत्त्व व निरोगी निरामय दीर्घायुष्याची गुरुकिल्ली म्हणजे भारतीय योग याची माहिती दिली. यावेळी योगशिक्षक पंढरपूर शहरातील सुप्रसिध्द योगगुरु श्री. चिंतामणी दामोदरे सर  यांनी योगासनाची माहिती दिली. योगशिक्षक श्री. दामोदरे सर व व कु. मिताली हावड  यांनी योगाची  शास्रोक्त  प्रात्यक्षिके दाखविली. यावेळी प्रशालेतील  सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमात सहभागी झाले होते. 
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आबासाहेब खरात सर यांनी केले. श्री. खरात सर यांनी आजच्या जीवनात योगाचे महत्व सांगितले व व्यवहारातील गरज सांगितली . पाहुण्यांचा परिचय श्री धारूरकर  यांनी केला. आभार प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. धारूरकर व सौ. सर्वगोड मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेचा क्रिडा विभागाचे श्री. गुलाखे सर , श्री. कुसुमडे सर, श्री. नरेंद्र डांगे सर व श्री. आबासाहेब खरात सर व सर्व शिक्षक बंधुभगिनी आदींनी परिश्रम घेतले.

         कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी  प्रार्थना, ओंकार, बैठक स्थिती व दंड स्थितीतील विविध आसने, ध्यानस्थिती व मुद्रा  यांचा सराव केला. कार्यक्रमासाठी 500 विद्यार्थी 30 शिक्षक व  पालक उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)