कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन

0
            पंढरपूर (प्रतिनिधी) – ‘रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, जिमखाना विभाग आणि पतंजली योग समिती पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने  महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर १० वा आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न झाला. या निमित्ताने पतंजली योग समितीचे प्रशिक्षक मधुकर सुतार यांनी योगासनांचे महत्त्व समजून दिले तर त्याचे प्रात्यक्षिक सुरेंद्र पिसे यांनी सादर केले. सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील सिनिअर, जुनिअर व व्होकेशनल विभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सेवक यांनी योगासनांचा सराव केला. या योगासनांमध्ये वृक्षासन, वज्रासन, वक्रासन, शवासन, भुजंगासन, मंडूकासन, पश्चीमोत्तानासन, वीरासन, भस्त्रिका, विलोम- अनुलोम, भ्रामरी आदी आसनांचे आणि प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले.’
            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅप्टन डॉ. समाधान माने यांनी केले. या  कार्यक्रमात पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशीलकुमार संसारे, विस्तार अधिकारी महेश वैद्य, शहाजान तांबोळी, उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, उपप्राचार्य राजेश कवडे, अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बलवंत, अधिष्ठाता डॉ. अनिल चोपडे, अधिष्ठाता डॉ. तुकाराम अनंतकवळस, राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. दत्तात्रय चौधरी तसेच महाविद्यालयातील सिनिअर, ज्युनिअर व व्होकेशनल विभागातील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी मान्यवरांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले. या कार्यक्रमास पतंजली योग समितीचे सुधीर अढवळकर, डॉ. संजय देशपांडे, गिरीश अढवळकर, राजेश क्षीरसागर, लखन पडळकर, मधुकर बाबर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. अमर कांबळे यांनी मानले. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)