पंढरपूर (प्रतिनिधी) - कोर्टी ता.पंढरपूर येथील मुसलमान येडगे वस्ती ते जुम्मा शेख वस्ती, मुसलमान वस्ती ते लायकाल्ली शेख वस्ती याठिकाणच्या
रस्त्याचे भूमीपूजन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य महेश (नाना) साठे यांच्या हस्ते करण्यात आले.
या रस्त्यामुळे या ठिकाणच्या लोकवस्तीवरील 500 लोकांची सोय झाली आहे. कित्येक वर्षाची होणारी गैरसोय हा रस्ता झाल्यामुळे थांबणार आहे. रस्त्यासाठी जिल्हा नियोजन फंडातून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख (शिवसेना) महेश (नाना) साठे यांनी या दोन रस्त्यासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये त्यांच्या निधीतून मंजूर केले आहेत. गेली दोन वर्षांमध्ये महेश साठे यांनी टाकळी, कोर्टी, गादेगाव, बोहाळी, उंबरगाव, सोनके,तपकिरी शेटफळ या गावांना विकास निधी देण्याची भूमिका अग्रक्रमाने घेतली आहे.
या भूमिपूजनप्रसंगी कोर्टी गावचे सरपंच राजाभाऊ पवार, माजी उपसरपंच तथा सदस्य महेश येडगे, ग्रामपंचायत सदस्य बबलू शेख, शरीफभाई शेख, इस्माईल शेख, असलम शेख, विजय काळे, हरून मुजावर, अनवर मुजावर, सोहेल मुजावर, महमूद शेख, राजाभाई शेख आदी ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.