प्रणिती शिंदेंनी काढला वडिलांच्या पराभवाचा वचपा
सोलापूर (प्रतिनिधी) - सोलापूर लोकसभा मतदारसंघाला प्रणिती शिंदे यांच्या रूपात पहिल्या महिला उमेदवार मिळाल्या आहेत. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी जवळपास 75 हजार मतांनी विजय मिळवलाय. भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा दारुण पराभव झालाय. 1951 पासून एकदाही सोलापुरात महिला खासदार जिंकून आल्या नव्हत्या. हा इतिहास आज प्रणिती शिंदे यांनी मोडलाय.
सोलापूर लोकसभा मतदार संघात सुशिलकुमार शिंदे यांना दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला होता. 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत सुशिलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. तर 2004 साली प्रणिती शिंदेंच्या आई उज्वला शिंदेंचा पराभव झाला होता. आता प्रणिती शिंदे यांनी भाजपचा पराभव करत वडिलांच्या पऱाभवाचा वाचपा काढला आहे.
1951 पासून सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकही महिला खासदार नव्हता. सोलापूर लोकसभा मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून म्हणजे 14 वेळा खासदार झाले होते, पण त्यामध्ये एकही महिला खासदार नव्हत्या. पण 2024 च्या निवडणुकीत सोलापूरकारांनी प्रणिती शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत इतिहास रचलाय.
--------------------------------------------------
सोलापूर लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी बीजेपीचे पाच आमदार असताना प्रणिती शिंदे यांनी गाव भेट व प्रचार दौरे मोठ्या प्रमाणात करून कार्यकर्त्यांच्या मदतीने सत्ताधाऱ्यांना शह देत मोठे मताधिक्य मिळवून विजय संपादन केला व पहिली महिला खासदार होण्याचा बहुमान मिळविला.
प्रणिती शिंदे यांनी मिळवलेल्या विजयामुळे पंढरीत ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी व गुलालांची उधळण करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
--------------------------------------------------