आपटे उपलप प्रशालेत शासकीय लाभाच्या योजनांचा जागर

0
              पंढरपूर (प्रतिनिधी) - येथील आपटे उपलप प्रशालेत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासनाच्या विविध लाभाच्या योजनाचा जागर यावर कँप घेण्यात आला. यामधे आज प्रशालेतील तब्बल १६ दिव्यांग विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला.
यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. अनिल  अभंगराव सर यांनी शासनाच्या विविध लाभाच्या योजनाची माहिती दिली.
         मुख्याध्यापक श्री. दतात्रय धारूरकर यांनी प्रशाला विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त विक्रमी संख्येने विद्यार्थ्यांना शासकीय लाभ मिळवून देण्यास तत्पर व कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी पंचायत समितीच्या विशेष शिक्षिका सौ. स्वामी मॅडम उपस्थित होत्या. त्यांचा सत्कार सौ. सर्वगोड मॅडम यांनी केला. त्याचवेळी प्रशालेत सौ. गावडे ताई यांचे तर्फे विद्यार्थ्यांना गणवेश दिले. व मा. अष्टेकर मॅडम यांच्या उपस्थितीत हा कार्यकम पार पडला.
        या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. आबासाहेब खरात सर यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. कुलकर्णी मॅडम यांनी केले. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर पालक प्रतिनिधी म्हणून श्री. कांबळे, श्री. लखेरी, श्री. अधटराव, श्री. प्रक्षाळे हे उपस्थित होते. या कार्यक्रमास श्री. हाके, श्री. जाधव, कुओव्हाळ, श्री. करकमकर सर, श्री. कुरे, श्री. भातलवंडे सर, कु. टेके,  श्री. थिटे यांनी लाभार्थ्यांना मदत केली

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)