पंढरपूर (प्रतिनिधी) - सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या पंढरीतील श्रीरुक्मिणी प्रतिष्ठानच्या वतीने गोरगरीब कुटुंबातील गरजू मुला-मुलींना शालेय साहित्यांचे वाटप श्रीरुक्मिणी प्रतिष्ठानच्या संस्थापिका सुनेत्राताई पवार यांचे मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षाप्रमाणे करण्यात आले.
शालेय साहित्यांचे वाटप रुक्मिणी बँक, रुक्मिणी विद्यापीठ संचालक व सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस आयचे अध्यक्ष सुनंजय (दादा) पवार यांचे शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुनंजय (दादा) पवार म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभ्यास करून उज्वल यश संपादन करावे. भरपूर मेहनत व अभ्यासाने विद्यार्थ्यांनी आपले भविष्य उज्वल करावे. हा या शालेय साहित्य वाटपामागील मुख्य उद्देश होय.
यावेळी सुनंजय दादा पवार युवा मंचचे पदाधिकारी व रुक्मिणी प्रतिष्ठानचे श्याम साळुंखे, मयूर भुजंगे, बिपीन देवमारे, ऋषिकेश आगवणे ,पंकज थोरात आदींसह विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.