ढोल - ताशांच्या गजरात झाडांची मिरवणूक काढून केले वृक्षारोपण

0
मारवाडी युवा मंच, महिला शाखा, युवा माहेश्वरी संघटनेचा कौतुकास्पद उपक्रम

पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश 

          सोलापूर (प्रतिनिधी) - चक्क ढोल ताशांच्या गजरात देशी झाडांची मिरवणूक काढून ५१ वृक्षारोपण करण्याचा उपक्रम मारवाडी युवा मंच महिला शाखेने रविवारी राबविला. महेश नवमीच्या निमित्ताने हा पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा कौतुकास्पद उपक्रम करण्यात आला.

          श्रीरूपाभवानी चौकातील हुतात्मा श्री. किसन सारडा स्मारकापासून झाडांच्या या मिरवणुकीस प्रारंभ झाला. ढोल ताशे वाजवत हि मिरवणूक परिसरातून नेऊन पुन्हा ही मिरवणूक हुतात्मा श्री. किसन सारडा स्मारक येथे आली. या ठिकाणी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, ब्रिजमोहन फोफलिया, माजी नगरसेवक संजय कोळी, राजकुमार पाटील यांच्या हस्ते झाडे लावण्यात आली.
        करंज, चिंच, कडुनिंब, आवळा अशा देशी झाडांचे रोपण यावेळी करण्यात आले. तसेच याप्रसंगी संयोजक श्रीनिवास दायमा यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ दिलेल्या विंधन विहिरीचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी संयोजक श्रीनिवास दायमा, गिरीष फोफलिया, राकेश सोनी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

         यावेळी संयोजक श्रीनिवास दायमा म्हणाले, पावसाचे व्यस्त प्रमाण पाहता झाडे लावणे ही काळाची गरज बनली आहे. झाडे नसतील तर आगामी काही वर्षांमध्ये मानवी जीवन सुरळीत राहणार नाही. त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत मारवाडी युवा मंच, महिला शाखेकडून ५१ देशी झाडे लावण्यात आली आहेत.

           या कार्यक्रमास संयोजक श्रीनिवास दायमा, गिरीष फोफलिया, राकेश सोनी, मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष आशिष उपाध्ये, सचिव कृष्णा झंवर, सोलापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल काबरा, सचिव कल्पेश हरकुट, मारवाडी युवा मंच महिला शाखेच्या अध्यक्षा सुनिता बजाज, सचिवा शैला सोमाणी, शाम खंडेलवाल, श्रीकांत तापडिया, अशोक शर्मा, सुनिल डागा, शाम भुतडा, अशोक गौड, बालाप्रसाद ओझा आदी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)