पंढरपूर (प्रतिनिधी) - खर्डी तालुका पंढरपूर येथील चव्हाण वस्ती ते शिरभावी रोड 25 15 योजनेअंतर्गत खडीकरण करणे मंजूर झाले आहे. या रस्त्याचे भूमिपूजन माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रस्त्या संबंधित अडचणी अधिकाऱ्यांना फोन लावून सोडवण्यात आल्या.
यावेळी युवक नेते प्रणव परिचारक व्हाईस चेअरमन कैलास खुळे, संचालक महादेव लवटे, भगवान सव्वाशे, उपसरपंच शरदभाऊ रोंगे, ग्रा.पं. सदस्य नारायण रोंगे, विष्णू सुळे, सत्यवान फाळके, मीनानाथ खताळ, हरीभाऊ खताळ, अशोक पाटील, शिवाजी पाटील, समाधान रोंगे, हनुमंत पाटील, उमाकांत रोंगे, दीपक पाटील, शरद रोंगे पाटील, डॉ.अमोल रोंगे पाटील, रणजीत रोंगे पाटील, मोहन रोंगे, सिताराम रोंगे, दादासो बागल, प्रशांत पाटील, सचिन टकले, आप्पासाहेब घाडगे, चिंतामणी कोळी, आप्पा चव्हाण, यांच्यासह पांडुरंग परिवारातील सदस्य, ग्रामस्थ, युवक, पदाधिकारी उपस्थित होते.