पंढरपूर (प्रतिनिधी) - श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉंजी अभियांत्रिकी महाविद्यालय, शेळवे येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन गुरुवार दि. ६ जुन २०२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सदरवेळी प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगीतले. तसेच सर्वांनी आपल्या जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या आदर्श समोर ठेवून त्यांच्या ठायी असणारे धैर्य, चातुर्य, कठोर परिश्रम, स्वछ चारित्र्य, महिलांप्रती आदर, व्यवस्थापन, निर्णय क्षमता असे अनेक गुण सर्वानी अंगिकारले पाहिजेत असे सांगून त्यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या.
सदर वेळी उपस्थितांनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत गीत गाऊन छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असणारा आदर व अभिमान व्यक्त केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध गड आणी किल्ले यांची माहिती देणारे प्रदर्शनही भरविण्यात आले होते.
श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन श्री. रोहन परिचारक यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. कणसे, रजीस्ट्रार श्री. जी. डी. वाळके, उप प्राचार्य प्रा. जे. एल. मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी तसेच विभागप्रमुख प्रा.एस. एम. लंबे, प्रा. डॉ. एस. व्ही. एकलारकर, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने, प्रा. गणेश बागल तसेच सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले होते.