जेष्ठ समाजसेवक स्व. राजाराम महादेव नाईकनवरे तृतीय पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी

0
नाईकनवरे परिवार व चिमुकल्यांनी दादांना दिल्या मानवंदना...

स्व: राजाराम महादेव नाईकनवरे यांची पुण्यतिथी राजकीय धार्मिक कला क्रीडा सांस्कृतिक सर्व क्षेत्रांमधील मान्यवरांनी दादांना वाहिली आदरांजली... 

         पंढरपूर (प्रतिनिधी) - ज्येष्ठ समाजसेवक स्व. राजाराम महादेव नाईकनवरे यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या कुटुंबाची पर्वा न करता सर्व गोर-गरीब बहुजन, समाजातील घटक एकत्र घेऊन तळागाळातील कार्यकर्त्यांना आपल्या सोबत घेऊन काम करणे, त्यांचा सर्व क्षेत्रांमध्ये दादांचा मोठा खारीचा वाटा होता. दादांची समाजाप्रती तळमळीने काम करण्याची आवड होती. त्यांना असे वाटे की; समाजातील सर्व लहान मुलांपासून ते तरुणांनी मोठे  व्हावे आणि आपल्या आई-वडिलांचे, गावाचे नांव करावे.  स्व: राजाराम महादेव नाईकनवरे यांनी एम.एस.ई.बी. च्या माध्यमातून काम, करत असताना सामाजिक बांधिलकी जपत होते, अनेक सर्वसामान्य कुटूंबाला अंधाराकडून  प्रकाशामध्ये आणण्याचे काम त्यांनी आपल्या माध्यमातून केले आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम आपल्या माध्यमातून दादा करत. स्व. राजाराम दादांचा  स्वभाव मनमिळावू व सर्वांशी हसत खेळत प्रामाणिकपणे आपले विचार सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याची काम करत.
        स्व: राजाराम महादेव नाईकनवरे यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम, भजन, कीर्तन सामाजिक धार्मिक असे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये महिलांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शविली आणि  या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून दादांना प्रतिमेस अभिवादन केले.
       यावेळी दादांना अभिवादन करतांना उपस्थित श्रीमती सुनंदा राजाराम नाईकनवरे, श्रीमती. कमल महादेव नाईकनवरे, विद्या वाघमारे, जनाबाई वाघमारे, मंडाबाई साठे, रेखाताई वायदंडे, सारिका नाईकनवरे,  काविरा खिलारे, मालन मोरे, उज्वला रणदिवे, रेश्मा लोखंडे, रुपाली नाईकनवरे, अनिता वाघमारे तसेच बहुसंख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या...
       सदर कार्यक्रमांच्या आयोजनासाठी दिपक नाईकनवरे यांनी अथक परिश्रम घेतले.
--------------------------------------------------
            संतपेठ, शाळा नं. ७ जवळ वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती पत्रकार संघाचे अध्यक्ष तानाजी जाधव, मा. मुन्नागिर गोसावी, मा. नगरसेवक संजय निंबाळकर, शिक्षण अधिकारी बिभीषण रणदिवे , प्रा. दत्ता कांबळे सुनील धोत्रे, चंद्रकांत खिलारे, समाजसेवक गुरु दोडिया, ग्रा.पं. सदस्य राजेंद्र बनसोडे, पी.एस.आय. भिमराव वाघमारे साहेब, मा. नगरसेवक कृष्णा वाघमारे, शैलेश आगावणे ॲड. किशोर खिलारे, नाथा यादव, कैलास जाधव, सागर नाईकनवरे, संदीप वाघमारे रत्नाकर नाईकनवरे, जीवन कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
--------------------------------------------------

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)