पोलीस किसान औरगैनिक एक्स्प्रेसचा दशकपूर्ती सोहळा
पंढरपूर (प्रतिनिधी) - सेवानिवृत्त पोलिस किसान बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित पंढरपूर ही संस्था स्थापन झाली असुन या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र पोलीस दलातील ४ लाख अधिकारी व कर्मचारी शेतकरी कुटुंबीय यांना वर्षभर पोलीस किसान शाश्वत कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण देऊन त्यांनी उत्पादित केलेला विषमुक्त निर्यातक्षम शेतमाल
"पोलीस" ब्रैंडने विक्री केली जात आहे. या राष्ट्रीय कृषी कार्याच्या प्रचार प्रसार प्रशिक्षण साठी राज्यस्तरीय पोलीस किसान अधिवेशनचे आयोजन केले होते. तसेच पोलिस किसान सहकारी संस्था 10 वर्षां पासून पोलीस किसान औरगैनिक एक्स्प्रेस पुणे ते पंढरपूर चालवित आहेत. या उपक्रमांद्वारे पंढरपुर येथील शेतकरी यांचा विषमुक्त शेतमाल शेतकरी ते थेट ग्राहक विक्री केला जातो. या पोलीस किसान औरगैनिक एक्स्प्रेसचा दशकपूर्ती सोहळा देखील पार पडला.
पोलीस किसान सोलापूर सुवर्ण कृषी प्रकल्प शुभारंभ उद्घाटक श्री विलास शिंदे चेअरमन सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी नाशिक व डॉ. श्री शिवाजीराव डोळे चेअरमन वेंकटेश्वरा जय जवान जय किसान कृषी सहकारी संस्था मालेगाव नाशिक हे होते.
या अधिवेशनामध्ये पोलीस किसान राज्यस्तरीय सेंद्रिय कृषी द्रोणाचार्य व सेंद्रिय कृषी रत्न पुरस्कार दिले गेले. या वर्षी हा पुरस्कार येरवडा खुले कारागृह येथे सेंद्रिय शेती करणार्या बंदी बांधवांना दिला हे वैशिष्ट्य होते. हा उपक्रम सेवानिवृत्त पोलीस किसान बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित पंढरपूर श्री. राजाभाऊ पाटील चेअरमन श्री. हनुमंतराव माने व्हाईस चेअरमन श्री. नानासाहेब कदम सचिव व संचालक मंडळ यांनी आयोजित केला होता.