पंढरपूर (प्रतिनिधी) - लोकनेते स्व.आ.भारत नाना भालके फाउंडेशन पंढरपूर-मंगळवेढा यांच्या वतीने सन मराठी चॅनल प्रस्तुत खास सर्व महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला आहे अशी माहिती लोकनेते स्व.आमदार भारत नाना भालके फाउंडेशनच्या संचालिका डॉ. सौ. प्रणिता ताई भगीरथ भालके यांनी दिली.
महिलांसाठी ही खास बाब म्हणून कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे, होम मिनिस्टर हा कार्यक्रम पंढरपूरात शनिवार दि २९ जून २०२४ रोजी सायंकाळी ४:३० वाजता मातोश्री मीराबाई महाराज मठ, कैकाडी महाराज मठाजवळ, पंढरपूर तर रविवार दि ३० जून २०२४ रोजी सायं ४:३० रोजी कालिकादेवी मंदिर कालिकादेवी चौक तर याच दिवशी सायंकाळी ६:३० मलपे चौक इसबावी, पंढरपूर या ठिकाणी होम मिनिस्टर, हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमासाठी सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आव्हान डॉ. सौ प्रणिताताई भगीरथ भालके यांनी केले आहे.
या कार्यक्रमासाठी सर्व महिलांना मोफत प्रवेश दिला जाणार असून, होम मिनिस्टर खेळा आणि जिंका. या कार्यक्रमासाठी जिंकणाऱ्या महिलांसाठी पैठणी साडी सह भरघोस बक्षीसे दिली जाणार आहेत.या कार्यक्रमाचे निवेदक जयवंत भालेकर हे करणार आहेत. हा कार्यक्रम लोकनेते स्वर्गीय आमदार भारत नाना भालके फाउंडेशन पंढरपूर- मंगळवेढा यांचे वतीने आयोजित करण्यात आला आहे.