पंचांगकर्ते मोहन दाते D.Lit (विद्यानिधी) पदवीने सन्मानित

0
           येवला जि. नाशिक (प्रतिनिधी) - गेल्या १०० वर्षांहून अधिककाळ महाराष्ट्रामधून प्रकाशित होणारे आणि महाराष्ट्रच नव्हे तर भारतभर लोकमान्य झालेल्या दाते पंचांगाचे कार्य गेली अनेक वर्षे श्री. मोहनराव दाते करीत आले आहेत. पंचांग क्षेत्रामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून दिनांक 9 जून 2024 रोजी रविवारी येवला येथे संपन्न झालेल्या मराठी संस्कृत साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पंचांगकर्ते डॉ.श्री. मोहनराव  दाते यांचा लोकमान्य संस्कृत विद्यापीठातर्फे कुलपति मा . श्री. मनोहरशास्त्री सुकेणकर यांचे  हस्ते आणि  डॉ. राजेश सरकार संस्कृत विभाग प्रमुख बनारस हिंदु विद्यापीठ (BHU) वाराणसी यांचे प्रमुख उपस्थितीत डी.लिट् (विद्यानिधी) हि सर्वोच्च पदवी देऊन गौरव करण्यात आला. 

        आरंभी  अंदरसुल येथील वेदमूर्ती गजानन  कुलकर्णी ,  वे . मू. सागर पाठक  यांनी  वेदमंत्र  घोष  केला . या समारंभाचे आयोजन व सूत्र संचालन पंडित प्रसाद शास्त्री कुलकर्णी यांनी केले.

        डॉ.श्री. मोहनराव  दाते यांना डी.लिट् (विद्यानिधी) हि सर्वोच्च पदवी मिळाल्याबद्दल  सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)