पंढरपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी चोरीला गेलेले 34 तोळे सोने जप्त

0
16 गुन्हे उघड तर 13 आरोपी गजाआड

           पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे हद्दीतील चोरी झालेल्या गुन्ह्याचा तपास लावण्यास पोलिसांना यश मिळाले आहे. यामधील एकूण दाखल झालेल्या 16 गुन्हे  उघडकीस आणले आहेत. त्यामधून एकुण ३४ तोळे. ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख शिरीष  सरदेशपांडे यांनी दिली आहे.

      या हस्तगत करण्यात आलेल्या सोन्याची एकूण २४ लाख १४ हजार रुपये किंमत होत आहे. 
           पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत   श्रीविठ्ठल मंदीरामध्ये दर्शनाकरीता एसटीने प्रवास करून येणा-या भावीकांची गर्दी ही नवीन एस टी स्टॅण्ड मध्ये प्रत्येक वारीस व अधुन मधुन होत असते. सदर एसटी मध्ये जागा पकडण्यासाठी व एसटी मध्ये वर चढत असताना भावीक प्रवासी यांचे गळ्यातील सोन्याचे मौल्यवान दागिणे चोरण्याचे प्रकार होवुन, त्याबाबत पंढरपुर शहर पोलीस ठाणेस गुन्हे दाखल करणेत आले होते. सदरचे हे चोरी करून एक तर एसटी मध्ये चढुन दुसरीकडे जायचे अन्यथा एस टी मध्ये चढुन त्याचे दुसरे सहकारी यांचेकडे सदरचे सोन्याचे दागिणे सुपुर्द करीत असल्याने, एस टी स्टॅण्ड वरील शिवपुराण कार्यक्रमा दरम्यान झाले गर्दीत व विरळ वस्तीचे ठिकाणी बंद घरावर पाळत ठेवुन, सदर कार्यक्रमातील व घरातील सोन्याचे दागिने घेवुन पळून जात होते. 
        या तपास कामी पंढरपुर शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक  विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली "गुन्हे प्रकटीकरण" शाखेचे अधिकारी व अंमलदार यांची विशेष पथके नेमुन पंढरपुर शहर व परिसरातील एसटी स्टॉप, नविन एस टी स्टॅण्ड व एस टी थांबण्याची ठिकाणे, पंढरपुर शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आले होते का? या बाबत माहिती काढली असताना, गोपनिय बातमीदाराकडुन एक बातमी मिळाली की, सदरचे आरोपी हे पंढरपुर शहर व इतर पोलीस ठाणेकडील रेकॉर्डवरील आरोपी सखाराम उर्फ सिकंदर छगन वाघमारे रा. नाळवंडी नाका बीड,  शाहरूख हमीद पठाण रा. शहनशाह नगर बीड,  अर्जुन भिमराव बाबर रा. पुरग्रस्त कॉलनी बीड,  रत्नाबाई बळी शेंडगे रा. इंदापुर,  ताई नाना दुबळे रा. कोरफळे, ता. बार्शी,  सुजाता युवराज बाबर रा. कारफळे, ता. बार्शी,  नितीन धर्मा किरतकरवी रा. कोरफळे, ता. बार्शी जि. सोलापूर,  शंकर विठ्ठल झेंड रा. पंढरपुर, महानंदा राम राठोड रा. कानडी पिंपळगांव ता. गेवराई जि. बीड, राजेंद्र मोहन काळे रा. कामती रोड, मोहोळ ता. मोहोळ,. राणी सखाराम उर्फ सिकंदर वाघमारे रा. माळवंही नाका बिड, . रतन बळी शेंडगे रा.आश्रमशाळा रोड साठेनगर, इंदापुर, ता. इंदापुर, जि. पुणे, . सोण्या उर्फ सोमनाथ उर्फ लाल्या ईश्वर भोटाले रा. बेलगांव, ता. कर्जत, जि. सोलापूर असे असल्याची व ते एसटीने नविण एस टी स्टॅण्डवर येवुन एसटी मध्ये चढत व उत्तरत असताना, धार्मिक कार्यक्रमा दरम्यान होत असलेले गर्दीचा फायदा घेवुन महीला व पुरुष यांचे गळ्यातील सोन्याचे दागिणे घोरत असल्याची व विरळ वस्तीवरील बंद घरातील सोन्याचे दागिणे चोटत असल्याची माहिती मिळालेले गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सापळा रचुन सदर आरोपी यांचे गावी बीड, कोरफळे, इंदापुर, सांगोला या ठिकाणी जावुन त्यांचे राहणीमान व त्यांचेवर पाळत ठेवुन, सदर आरोपींना इकडील दाखल गुन्हयाचेकामी ताब्यात घेतले असता,  पोलीस ठाणेस आणुन त्याचेकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी पंढरपुर शहर पोलीस ठाणे हद्दीत आपण व आपले साथीदारासह एस टी स्टॅण्ड, मंदीर परीसरात तसेच गर्दी होणारे मठ, व शिवपुराण कार्यक्रमावेळी व बंद घरातील सोण्याचे दागिणे चोरी केल्याचे सांगितले.
       विविध ठिकाणी राहणारे आरोपी यांचा नवीन एस टी स्टॅण्ड, तसेच पंढरपुर शहर पोलीस ठाणे ह‌द्दीतील गोपनीय बातमीदारांचे मार्फतीने सदर संशयितांच्या वास्तव्याची माहिती हस्तगत करून घेवुन गुन्ह्याचा कौशल्यपुर्ण सखोल तपास केला असता आरोपींनी खालील गुन्हे केल्याचे उघडकीस आणले आहेत.
         सदरची कामगीरी ही  पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, .अपर पोलीस अधिक्षक . प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग  डॉ. अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे  विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक  प्रकाश भुजबळ, सपोफौ राजेश गोसावी, सपोफौ नागनाथ कदम,  बिपीनचंद ढेरे,   सुरण हेंबाडे,  शरद कदम,  सिरमा गोडसे,  नितीन पलुसकर,  सचिन हेंबाडे,  नवनाथ माने,  शहाजी मंडले, समाधान माने,  बजरंग बिचुकले,  निलेश कांबळे तसेच सायबर शाखा सोलापुर ग्रामीणचे योगेश नरळे यांनी केली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)