मा.आ. प्रशांतराव परिचारक यांचेहस्ते खर्डी ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा

0
खर्डी ग्रामपंचायतीच्या ४ कोटीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा

           पंढरपूर (प्रतिनिधी)  - खर्डी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकास योजनेतुन पुर्ण झालेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा व विविध योजनेतून मंजुर झालेल्या विकास कामांचा शुभारंभ सोहळा मा.आ. प्रशांतराव परिचारक (मालक) यांच्या शुभहस्ते शुक्रवार दि. १२/०७/२०२४ रोजी सायंकाळी ०४:०० वा. संपन्न होणार आहे.

        सदर कार्यक्रमास मा. उमेश परिचारक, सुशिल संसारे गट वि.अधिकारी  पं.स.पंढरपूर, एस.व्ही. पुजारी उपअभियंता, ग्रा.पा.पु. उपविभाग पंढरपूर, प्रणवजी परिचारक, एस.एन. लवटे उपअभियंता, जि. प. बांधकाम पंढरपूर, व्ही. एस. खंडागळे शाखा अभियंता, शिंदे यु.बी.शाखा अभियंता यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध योजनेतून मंजुर झालेल्या विकास कामांचा शुभारंभ सोहळा संपन्न होणार आहे. तसेच या कार्यक्रमास मनिषा भगवान सवासे सरपंच ग्रा.पं. खर्डी, शरद शामराव रोंगे उपसरपंच, ग्रा.पं. खर्डी, बी.व्ही. कुलकर्णी ग्रामविकास अधिकारी, खर्डी व सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ तसेच पांडुरंग परिवार, पंचायत समिती गट व जिल्हा परिषद गट सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामपंचायतीचे वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)