यंदा महाआरोग्य शिबीरात नवीन विश्वविक्रम - प्रा.शिवाजीराव सावंत

0
आषाढी एकादशीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे काम अंतिम टप्प्यात

          पंढरपूर (प्रतिनिधी) -- आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या सर्व वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य विभाग आणि भैरवनाथ शुगर यांच्या संयुक्त विद्यमानाने पंढरपूरच्या चार ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराची जय्यत तयारी सुरू असून शिबीराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. महाआरोग्य शिबिराचे काम अंतिम टप्प्यात आलेली पाहणी भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत हे करत होते. मागील याञेच्या आरोग्य शिबीराचे "यंदा महाआरोग्य शिबिर विश्वविक्रम होईल" असा अंदाज भैरवनाथ शुगरचे चेअरमन शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी व्यक्त केला.
       पंढरपूर येथील वाखरी, गोपाळपूर, तीन रस्ता, ६५ एकर या ठिकाणी मैदानात महाआरोग्य शिबिराचा भव्य शामियाना उभा करण्यात आलेला असून त्या ठिकाणी प्राध्यापक सावंत पत्रकारांचे बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्र्याचे पी. ए. अरुण लटके, सिव्हील सर्जन डॉक्टर सुभाष माने, गुरुनाथ ठिगळे, श्याम सावजी, दत्तात्रय पवार, रुपेश कोळेकर आदी उपस्थित होते.
     आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा दि. 17 जुलै रोजी साजरा होत आहे. या सोहळ्याकरीता माऊली, तुकोबाराया यासह असंख्य पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. या पालख्या, दिंड्या मजलदरमजल करत पंढरपूरला येत आहेत. पंढरीत किमान 15 ते 18 लाख भाविक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याअनुषंगाने भाविकांनाच्या आरोग्याला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. यासाठी राज्यातील वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स यांच्यासह परराज्यातून देखील वैद्यकीय पथके कार्यरत करण्यात आली आहेत. तसेच पालखी सोहळा प्रस्थानापासून वारकरी भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यावर विशेष लक्ष ठेवून आहेत.

         सर्व दवाखान्यातून 24 तास सेवा -
पंढरपूरकडे प्रस्थान करणार्‍या दिंड्यांच्या प्रत्येक मार्गावर आरोग्य विभागाचे सर्व दवाखाने तसेच खाजगी हॉस्पिटल 24 तास सुरू राहतील याची दक्षता घेण्यात आली आहे. पालखी मार्ग, वाळवंटात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता तेथे बाईक अ‍ॅम्ब्युलन्सची उपलब्धता करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत मिळत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)