पंढरपूर (प्रतिनिधी) - वसंतदादा काळे मेडिकल फाऊंडेशन,संचलित जनकल्याण हॉस्पिटल पंढरपूर यांचे वतीनेआषाढी यात्रेतील वारकरी भाविकांसाठी एकादशी दिवशी मोफत तपासणी करून उपचार करण्यात आले. त्यामधे अनेक भाविकांनी लाभ घेतला.
स्व. वसंतदादा काळे यांचे प्रेरणेने, सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे साहेब यांनी सामान्य माणसाच्या आरोग्य सेवेसाठी सप्टेंबर 2007 रोजी जनकल्याण हॉस्पिटलची उभारणी केली, हे हॉस्पिटल आजपर्यंत अनेक गरीब, गरजू रुग्णांचा आधार बनले आहे.
आषाढी वारी निमित्त आलेल्या भाविकांसाठी, पंढरपूर येथील विविध भागात रुग्णांची मोफत तपासणी करून उपचार करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधीर शिनगारे, डॉ. राजेंद्र माने, डॉ. विजय मूढे यांनी रुग्ण तपासणी केली. सूरज रजपूत, जुनेद शेख तसेच मेडिकल व नर्सिंग स्टाफनी सहकार्य केले.