पंढरपूर (प्रतिनिधी) - कोर्टी येथील संत सावता माळी ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजाराम वाघमारे यांची निवड सर्वांनुमते बिनविरोध करण्यात आली.
त्यांचा सत्कार प्रसंगी नूतन चेअरमन राजाराम वाघमारे म्हणाले की- पतसंस्थेची आर्थिक बाजू भक्कम करून सभासद व कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ व पतसंस्थेचा कारभार पारदर्शक पद्धतीने चालवून एक आदर्श संस्था म्हणून नावलौकिक मिळवून देऊ.
यावेळी निवडीत श्रीमंत सुधाकरपंत परिचारक कारखान्याचे संचालक भैर माळी, विठ्ठलचे माजी संचालक धोंडीबा वाघमारे, माजी चेअरमन रघुनाथ वाघमारे, नूतन संचालक मुरलीधर हाके, दादा वाघमारे, भैरू वाघमारे, युवा नेते अमोल दहिवडकर, संजय वाघमारे, भाऊसाहेब टोपे, ज्ञानेश्वर होनमाने, तसेच माळी टोपे वाघमारे, समाजातील सर्व बांधव व नूतन संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणूक निकाल जाहीर होताच गुलालाची उधळण व आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.