मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी पोस्ट ऑफिस मध्ये सेव्हिंग खाते उघडण्याची विशेष मोहीम सुरु

0
        पंढरपूर (प्रतिनिधी ) - भारतीय डाक विभागाच्या वतीने पुणे रिजनचे मा. पोस्टमास्तर जनरल मा. रामचंद्र जायभाये साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्रीम. सिमरन कौर, निदेशक डाक सेवा, पुणे रिजन, पुणे यांच्या प्रेरणेने पंढरपूर डाक विभागातील पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, माढा आणि करमाळा तालुक्यातील सर्वच 278 पोस्ट ऑफिस मध्ये “मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील संभाव्य लाभार्थींची” सेव्हिंग खाती उघडण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले असल्याची माहिती पंढरपूर डाक विभागाचे अधीक्षक मा. चंद्रकांत भोर साहेब यांनी दिली.

     सरकारी सर्व प्रकारचे (DBT) अनुदान पोस्ट ऑफिस मध्ये असलेल्या सेव्हिंग खात्यामध्ये जमा होत आहे.  त्यामुळे पोस्टाचे सेव्हिंग खाते हे बचत करण्यासाठी आणि अनुदान प्राप्त नागरिकांसाठी उत्तम पर्याय आहे.

         यासाठी ज्यांना पोस्टात सेव्हिंग खाते उघडवयाचे आहे त्यांनी स्व – साक्षांकित एक Pancard झेरोक्स, एक आधारकार्ड झेरोक्स व तीन फोटोसह  जवळच्या पोस्ट ऑफिसशी अथवा पोस्टमन यांचेशी संपर्क साधल्यास पोस्टाचे सेव्हिंगचे खाते तात्काळ उघडले जाईल असे आवाहन पंढरपूर मुख्य डाकघराचे पोस्टमास्तर श्री. सोमनाथ गायकवाड यांनी केले आहे. 

          तसेच पोस्ट खाते हे लोकांचे विश्वासाचे खाते असून पोस्टात विविध बचतीच्या, विम्याच्या योजनेत ठेवलेले पैसे हे सुरक्षित आणी उच्च व्याजदर देणारे आहेत. काळानुसार सामाजिक सुरक्षा, अपघाती विमा संरक्षण देणाऱ्या योजनाही प्रत्येक पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध आहेत.  पोस्ट ऑफिस मध्ये ठेवलेले पैसे खात्रीने व्याजासह परत मिळण्याच्या बाबत असणारी आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता हे पोस्ट ऑफिसचे वैशिष्ट आहे.

      त्यामुळे ग्रामीण आणी शहरी भागातील भगिनींना “मुख्यमंत्री लाडकी बहिण” या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये सेव्हिंग खाते काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे त्याचा लाभ माता - भगिनींनी घ्यावा असे आवाहन अधीक्षक डाकघर, पंढरपूर विभाग, पंढरपूर यांनी केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)