लायन्स क्लब पंढरपूरच्या अध्यक्षपदी पुनःश्च ला. आरती बसवंती तर सचिवपदी पुन:श्च ओंकार बसवंती

0
       पंढरपूर (प्रतिनिधी )  लायन्स क्लब पंढरपूरच्या गतवर्षीच्या अध्यक्षा ला. आरती बसवंती यांनी गतवर्षी अतिशय विधायक कामे करून क्लबच्या यशाची कमान उंचावली. अतिशय उपयुक्त असे प्रोजेक्ट काही अडचणीमुळे अपूर्ण राहिले होते,  ते पूर्ण करण्यासाठी समाजातील अनेक दानशूर लोकांनी निधी दिला त्यामुळे. ते सर्व रखडलेले प्रोजेक्ट विद्यमान अध्यक्षा ला. आरती बसवंती यांनीच पुर्ण करावेत असे बऱ्याच सदस्यांचेही मत होते म्हणून बहूमताने आरती बसवंती यांना पुन्हा एकदा अध्यक्षपदासाठी संमती दिली.
         ला. आरती बसवंती यांनी आपले गेल्या वर्षीचे सहकारी संचालक मंडळ कायम ठेवले आहे. सचिव-ला. ओंकार बसवंती, खजिनदार ला. शोभा गुप्ता प्रथम उपाध्यक्ष ला. सीमा गुप्ता यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

         सदर वर्षी पंढरपूर शहरात तीन गरजेच्या ठिकाणी चिल्ड्रेन पार्क बनवणे व डायलीसिस मशीनची गरीब रुग्णां साठी माफक व आवश्यकतेनुसार मोफत सेवा देणे हा आपला मानस असल्याचं मत यावेळी ला. बसवंती त्यांनी व्यक्त केले आहे.

       क्लबमधील जास्तीत जास्त ज्येष्ठ सदस्यांनी या कामी लायन आरती यांना सहकार्य करण्याचे अभिवचन दिले आहे.
ज्येष्ठ क्लब सदस्य ला. रा. पां. कटेकर,ला. भारत वाघुले, ला. कैलास करंडे, ला. निर्मला पाटील, ला. मुन्नागीर गोसावी, ला.राजेंद्र शिंदे,ला. राजेंद्र गुप्ता, ला. डॉ. अमित गुंडेवार, ला. डॉ. मनोज भायगुडे,या व इतर बहुसंख्य संचालकांनी ला. आरती यांना शुभेच्छा दिल्या. पंढरपूरातील मान्यवरांनीही सहकार्याचे अभिवचन व शुभेच्छा दिल्या.

            लायन्स च्या वरिष्ठांनी व पंढरपुरातील आमच्या सदस्यांनी, मार्गदर्शक यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ करून दाखवु तसेच मागील वर्षाहुनही अधिक सरस कामगिरी लायन्स क्लबच्या माध्यमातून करुन दाखवू. असा मनोदय यावेळी अध्यक्षा ला.आरती बसवंती व सचिव ला. ओंकार बसवंती यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)