श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व शेतकऱ्याची हित जपणारे पंढरपूर तालुक्याच लाडके नेतृत्व मा. श्री. अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
पंढरपूर (प्रतिनिधी) - श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या ३९ व्या वाढदिवसानिमित्त झंजावात दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्ती मैदान , भव्य रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, महारोग्य शिबिर, डोळे तपासणी शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आला आहे.
1 ऑगस्ट रोजी चेअरमन अभिजीत आबा पाटील यांचा माढा व पंढरपूर मधील नियोजित दौरा.....
सकाळी नऊ वाजता श्रीसंत नामदेव महाराज पायरी महाआरती व दर्शन, सकाळी साडेनऊ वाजता टेंभुर्णी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उपस्थिती, सकाळी साडेदहा वाजता अरण येथील संत सावता महाराजांच्या समाधीचे दर्शन, सकाळी 11 वाजता माढा येथील माढेश्वरी मंदिराचे दर्शन, दुपारी दोन वाजता विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर औदुंबर आण्णा पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन, दुपारी चार वाजता मंगळवेढा येथील संत दामाजीपंत मंदिर दर्शन व जय तुळजाभवानी मंदिराचे दर्शन, संत चोखामळा समाधीच दर्शन, पीर साहेब दर्गा येथे दर्शन घेऊन सायंकाळी सात वाजता पंढरपूर येथील जन संपर्क कार्यालय येथे आपल्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत…