युवकांचे प्रेरणास्थान - मा. श्री. अभिजीत (आबा) पाटील

0
कर्तबगार चेअरमन मा. श्री. अभिजीत (आबा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त.......

           पंढरपूर (प्रतिनिधी) - युवकांचे प्रेरणास्थान असणाऱ्या अभिजीत पाटील यांच्या सोबत  170 मित्र परिवार यांनी एकत्रितपणे डीव्हीपी उद्योग समूहाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. चार जिल्ह्यातील चार साखर कारखाने घेवून धाराशिव साखर कारखाना युनिट 1, 2, 3 व 4 हे अल्पावधित नावारूपास आलेले श्री. अभिजीत पाटील यांची दुरदृष्टी व खंबीर मित्रांची साथ संस्थेवर असलेले प्रेम आणि कामाप्रती असलेली कर्तव्यनिष्ठा यातून हा उद्योग दरवर्षी प्रगती करत आहे. कामातील प्रामाणिकपणा यामुळेच चार साखर कारखाने प्रगतीपथावर आहेत. ऊस वाहतूक ठेकेदार ते चार साखर कारखान्यांचा चेअरमन असा त्यांचा थक्क करणारा प्रवास सुरु आहे.
       चेअरमन अभिजीत (आबा) पाटील यांच्याकडे असलेल्या संघटन कौशल्यामुळे आबांनी सोलापूर जिल्ह्यातील तरुण वर्गांना आपल्या कामाने आपलेसे केलेले आहे. आबांचे व्यक्तिमत्व अभ्यासू असल्यामुळे तसेच सर्व गोष्टींचा इत्यंभूत अभ्यास करून त्या विषयावर भाषण करणे हे त्यांचे वैशिष्ट्य. हसरा चेहरा, प्रेम आपुलकीने सर्वांशी वागणे-बोलणे असल्यामुळे तरुण वर्गामध्ये आबांचे  विशेष आकर्षण आहे. 

ऑक्सिजन निर्मितीतून वाचविले शेकडो जीव...
      संपूर्णदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला, लोक जीवानीशी जावू लागले, त्यावेळी देशाचे नेते शरद पवार साहेब यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु करावे असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत त्यावेळी अभिजीत पाटील यांनी स्वतःच्या साखर कारखान्यांत ऑक्सिजन निर्मितीचे शिवधनुष्य उचलले. साखर कारखान्यामध्ये ऑक्सिजन निर्मिती खरेतर हे धाडसाचे पाऊल होते. या प्रकल्पाला पूर्ण करण्यास कमीतकमी तीन महिने तरी लागतील असे जाणकारांचे मत होते. मात्र, हा प्रकल्प १५ दिवसांत पूर्ण करण्याचा ध्यास श्री. अभिजीत आबा पाटील यांनी घेतला. त्यासाठी तोटा सहन करून इथेनॉल प्रकल्प बंद ठेवला. दिवसाचे चोवीस तास अविरतपणे काम करून सुरू असलेल्या प्रकल्पामध्ये तांत्रिक बदल करून फक्त काही मोजकेच पार्टस परदेशातून मागवून संपूर्ण भारतीय बनावटीचा राज्यातील नव्हे तर संपूर्णदेशातील साखर कारखान्यातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प अवघ्या १५ दिवसांमध्ये चालू केला. या ऑक्सिजन प्रकल्पाचे उदघाटन करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे साहेब, देशाचे कें द्रीय रस्ते व वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार साहेब, जलसंपदामंत्री श्री. जयंत पाटील साहेब, आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे साहेब, उस्मानाबादचे पालक मंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील व इतर मान्यवरांनी कारखान्याचे अध्यक्ष श्री. अभिजीत आबा पाटील यांच्या धाडसाचे कौतुक केले.
      हा प्रकल्प संपूर्णदेशासाठी मार्गदर्शक ठरेल असे गौरवोद्गार काढले. हा ऑक्सिजन प्रकल्प देशासाठी दिलासादायक व इतर कारखान्यांसाठी दिशादर्शक ठरला आहे. ग्रामीण भागातील सर्व सामान्य कुटुंबातील तरुण अभिजीत पाटील सारखे मोठे उद्योजक, सामाजिक, राजकिय विविध क्षेत्रात मोठे योगदान देऊ शकतो. त्यासाठी तरुणांनी अभिजीत पाटील यांच्या सारखी मोठी स्वप्ने पाहून आपली ध्येये निश्चित करुन जिद्दीने धाडसाने चिकाटीने आपल्या स्वतः बरोबर आपण या देशाचे मातीचे काही तरी देणे लागतो. म्हणून आपण आपल्या राष्ट्राला, आपल्या राज्याला, आपल्या जिल्ह्याला, आपल्या तालुक्याला व गावाला समृद्ध करण्यासाठी आपल्या सोबत अभिजीत पाटील यांच्या प्रमाणे निर्व्यसनी मित्रांचा  समूह उभा करावा.
           सोलापूर जिल्ह्यातील तरुणांचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांचे अभिजीत आबा पाटील हे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन अभिजीत आबा पाटील मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)