नटराज भरतनाट्यम अकादमी मध्ये गुरुपोर्णिमा उत्सव साजरा

0
         पंढरपूर (प्रतिनिधी) - गेल्या १८ वर्षांपासून सुरु असलेल्या नटराज भरतनाट्यम अकादमी मध्ये गुरुपोर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  नृत्य नाट्य संगीताची मुख्य देवता श्रीनटराज व बुद्धी विद्येची देवता माता सरस्वती यांच्या मूर्तीचे पूजन अकादमीच्या मुख्य संचालिका सौ. लक्ष्मी नारायण बडवे यांच्या हस्ते संपन्न झाले. महाद्वार रोड येथील शाकंबरी मंदिराशेजारील सद्गुरू सखाराम हॉल येथे भरतनाट्यमचे शिक्षण घेणाऱ्या 65 विद्यार्थिनी यांनी आपल्या नृत्यकलेच्या माध्यमातून गुरुवंदना सादर केली. 
          भरतनाट्यम हा फक्त नृत्य प्रकार नसून आयुष्यातील ताण- तणाव नैराश्य घालवून ऊर्जा चैतन्य आणणारा एक प्रकारे गुरूच आहे व भरतनाट्यम शिकत असताना होणारा शारीरिक बौद्धिक व मानसिक व्यायाम दैनंदिन जीवनातही उपयोगी पडतो अश्या प्रकारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी गुरुपौर्णिमे निमित्त आपली मनोगते व्यक्त केली. 
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मृणाल बडवे यांनी केले तर श्री प्रणव नाझरकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)