श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा १५ जुलै रोजी

0
वारकर्‍यांसाठी अभिनव उपक्रम 

             पुणे (प्रतिनिधी) ः विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, श्रीक्षेत्र आळंदी देहू पंढरपूर परिसर विकास समिती आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि १५ जुलै २०२४ रोजी दुपारी १.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा पंढरपूर, वाखरी येथील पालखी तळाच्या शेजारी  विश्वशांती गुरुकुल परिसरात होणार आहे. वारकर्‍यांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड व वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेच्या संयोजन समितीचे सचिव विलास कथुरे यांनी केले आहे.
             स्पर्धेचे उद्घाटन खासदार करवीर अधिपती श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. तसेच उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, हिंद केसरी दिनानाथ सिंग, आमदार समाधान आवताडे व महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
           अध्यक्षस्थानी श्री क्षेत्र आळंदी देहू पंढरपूर परिसर विकास समितीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील.
          आयोजित स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वारकरी मल्लांनी १५  जुलै  २०२४ रोजी सकाळी ७.३० वा. विश्वशांती गुरूकुलच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ आपली नावे नोंदणी करावी. सोबत वयाचा पुरावा म्हणून आपले आधार कार्ड किंवा शासनमान्य ओळखपत्र ठेवावे. अधिक माहितीसाठी डॉ.पी.जी.धनवे मो.नं.९८२२६२६००६ व श्री. विलास कथुरे मो. नं.९८५०२११४०४ यांच्याशी संपर्क साधावा.
आयोजित स्पर्धा
    वयोगट               प्रथम क्रमांक    द्वितीय क्रमांक        तृतीय क्रमांक
   १६ ते २५ वर्ष       रु. ४,०००/-     रु. ३,०००/-            रु. २,०००/-
   २६ ते३५ वर्षे        रु. ५,०००/-     रु. ४,०००/-            रु. ३,०००/-
   ३६ ते ४५ वर्षे      रु. ६,०००/-     रु. ५,०००/-            रु. ४,०००/-
   ४६ ते ५५ वर्षे,       रु. ७,०००/-     रु. ६,०००/-          रु. ५,०००/-
   ५६ ते ६५ वर्षे         रु. ८,०००/-     रु. ६,०००/-          रु. ५,०००/-
   ७० वर्षाच्या पुढे     रु. ५,०००/-     रु. ३,०००/-            रु. २,०००/-
(प्रथम - सुवर्ण पदक, द्वितीय - रौप्य पदक, तृतीय - कांस्य पदक व रोख रक्कम)
       विशेष आकर्षण म्हणजे योगमहर्षी वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा यांच्या स्मृति प्रित्यर्थ तंदुरूस्त अशा  सत्तर (७०) वर्षे वयाच्या  पुढील मल्लांसाठी याच दिवशी आगळी वेगळी कुस्ती स्पर्धा होईल.
          १६ ते २५ वयोगटातील विजेत्यास ‘कुमार वारकरी कुस्ती महावीर’ पुरस्कार, ५६ ते ६५ वयोगटातील विजेत्यास ‘वारकरी कुस्ती महावीर’ पुरस्कार आणि ७० वर्षांच्या पुढील विजेत्यास ‘ज्येष्ठ वारकरी कुस्ती महावीर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. विजेत्या कुस्ती महावीरांचा सन्मान - मानाचा फेटा, माऊलींची/जगद्गुरुंची प्रतिमा, शाल, स्मृतिचिन्ह, सुवर्ण/रौप्य/कांस्य पदक व रोख रकमेची बक्षिसे देऊन गौरव करण्यात येणार आहे.
         महाराष्ट्रातील या लोककलेला परत संजीवनी मिळावी म्हणून याच दिवशी रात्री ८.०० ते ११.०० वाजेपर्यंत, वारकर्‍यांना अत्यंत प्रिय असलेल्या शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचे प्रसिध्द असलेले नाथांचे भारूड व गवळणी ही स्पर्धा डॉ. संजय उपाध्ये व ह.भ.प. सुदाम महाराज पानेगावकर यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)