मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निष्ठावंतांचा पंढरीत स्तुत्य उपक्रम
पंढरपूर (प्रतिनिधी) - आषाढी महाएकादशीचा सोहळा अगदी नजदीक येऊन ठेवला आहे. आषाढी वारी निमित्त पंढरपुरात येणाऱ्या सर्व भाविकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मोफत अन्नदान उपक्रम शिवसेना ठाणे विभाग यांच्या वतीने पंढरपूर येथील नवीन बस स्थानक, मनमाडकर मठ परिसर या ठिकाणी करण्यात आले आहे.
यासाठी नवीन बस स्थानक व मनमाडकर मठ परिसरात शामियाना उभारण्यात आला आहे. याची पाहणी ठाणे महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती राम रेपाळ, शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली.
यावेळी बोलताना राम रेपाळ म्हणाले की, राज्याचे आराध्य दैवत श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल होतात या येणाऱ्या भाविकांसाठी विविध सोयी सुविधा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. गतवर्षीप्रमाणे यंदाही मोफत अन्नदान ठेवण्यात आले असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना महेश साठे म्हणाले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व नागरिकांसाठी विविध योजना राबवण्याचे काम केले आहे. यामध्ये लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी विविध योजना, यंदा प्रथमच पालख्यातील दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. यामुळे राज्यातील जनतेमध्ये पुढील काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहावेत अशी भावना असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांच्यासोबत ठाणे येथील जयप्रकाश कोटवाणी, रोहित गायकवाड, मुबीना मुलानी, प्रियांका परांडे, प्रमिला कुराडे, तानाजी वसेकर, पांडुरंग शिंदे, सतीश पाटील, सुरेश पवार सचिन शिंदे, बाळू भोसले, सिद्धेश्वर शिंदे, किसन काळे, वैशाली काळे, विजय चव्हाण, अमोल भोसले, शिवतेज चव्हाण, हंबीर काळे, जनार्धन काळे उपस्थित होते.