भाविकांच्या सुविधेसाठी ‘पंढरीची वारी’ ॲप सुरु

0
             पंढरपूर (प्रतिनिधी) - आषाढी यात्रा शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांना प्रशासनाकडून सोलापूर वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती उपलब्ध होणार आहे. याशिवाय पालखी मार्गावर वारकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. गर्दीच्या काळात मदत व्हावी, यासाठी आषाढी वारी मध्ये पंढरीची वारी नावाने मोबाईल ॲप https://play.google.com/store/apps/details?id=com.aashadhi_wari   सुरु करण्यात आले आहे. या ॲपचा लाभ भाविकांनी घ्यावा. 
                ज्या महामार्गावरून दिंडी सोहळा येणार आहे, तो महामार्ग ते पंढरपूरपर्यंत पोहोचेपर्यंत अॅप वारकऱ्यांना माहिती देण्यासाठी उपयुक्त ठरेल. यामध्ये वारीचे मुक्काम ठिकाण, पोलिस स्टेशन, मंदिर, पाण्याचा टँकर, हॉस्पिटल, वाहनतळ, शाळा, शौचालय, जवळपासची शासकीय कार्यालये आदी ठिकाणांची माहिती अॅपव्दारे होणार आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)