वारकरी पैलवानांमुळे लाल मातीची शोभा वाढली - हिंद केसरी पै. दिनानाथ सिंग

0
श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेचे उद्घाटन

           पंढरपूर (प्रतिनिधी)  दि.१५ जुलै - “लाल मातीतील कुस्तीला जगविण्यासाठी डॉ. विश्वनाथ कराड अथक प्रयत्न करीत आहेत. ज्ञान सागराबरोबरच त्यांनी शक्तिची पुजा केली आहे. येथे आलेल्या वारकरी पैलवानांमुळे या लाल मातीची शोभा वाढली आहे, तसेच त्यांनी या क्षेत्राला नवसंजीवनी दिली आहे.”असे विचार हिंद केसरी पै. दिनानाथ सिंग यांनी व्यक्त केले.
         विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत, श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समिती, पुणे यांच्यातर्फे वाखरी, पंढरपूर येथे पालखी तळाच्या शेजारी, विश्वशांती गुरुकुल परिसरात वारकरी भाविक भक्तांसाठी आषाढी वारीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या “श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या वेळी महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री ह.भ.प. बबनराव पाचपुते, माजी खासदार नानासाहेब नवले,  प्रसिद्ध मराठी अभिनेता संदीप पाठक, कॅनडा निवासी रवी जोशी  हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच, विश्वशांती केंद्र (आळंदी),माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड,  ह. भ. प. तुळशीराम दा. कराड, प्रगतशील शेतकरी काशीराम दा. कराड,  एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हसिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, डॉ. एस.एन. पठाण, डॉ. संजय उपाध्ये, श्रीकांत देशमुख, वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेच्या संयोजन समितीचे सचिव प्रा.विलास कथुरे आणि डॉ. टी. एन. मोरे उपस्थित होते.
            हिंदकेसरी पै. दिनानाथ सिंग म्हणाले, “हा सोहळा मन आणि चित्त प्रसन्न करतो. त्यामुळे येथे येणार्‍या प्रत्येक भक्ताला तीर्थक्षेत्रात आल्याची अनुभूती मिळते. डॉ. कराड यांनी वैष्णवांच्या मेळाव्यात कुस्तीचा आखाडा भरविला आहे. येथे भक्ती आणि शक्तीचा आदर्श उभा राहिलेला दिसत आहे.”
           विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“मऊ मेणाहुनि आम्ही विष्णुदास कठीण वज्रासी भेदू ऐसे, असा हा वारकरी संप्रदाय  जगाला सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल. आज येथे भक्ती आणि शक्तीचा संगम दिसून येत आहे. नवी पिढी व्यसनाच्या आहारी जावू नये यासाठी कुस्ती भरविण्यात येते. त्यांनी मनगटात ताकद आणावी.”
         या कार्यक्रमाचे प्रा.विलास कथुरे यांनी प्रास्ताविक  केले. डॉ. पी.जी धनवे यांनी कुस्ती स्पर्धाचे नियोजन केले. सूत्रसंचालन डॉ. महेश थोरवे यांनी केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)