प्रशालेत आठवडाभर सुरू असलेल्या शिक्षण सप्ताहाची सांगता
पंढरपूर (प्रतिनिधी) - विद्या विकास मंडळ पंढरपूर संचलित आपटे उपलप प्रशालेत आठवडाभर सुरू असलेल्या शिक्षण सप्ताहाचा सांगता समारंभ प्रभात फेरीने संपन्न झाला. या फेरीमध्ये प्रशालेतील बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते. पर्यावरण रक्षण, वृक्ष लागवड, साक्षरता, बेटी बचाव, प्रदूषण टाळा यासारख्या विषयांचे बॅनर तयार करून विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या.
या रॅलीमध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. धारूरकर सर, पर्यवेक्षक श्री अभंगराव सर, जेष्ठ शिक्षक कुसुमाडे सर, भातलवंडे सर, मुखरे सर , कुरे सर, हाके सर, गंगेकर सर, जगदीश डांगे सर , सौ. सर्वगोड मॅडम, कुलकर्णी मॅडम, आगावणे मॅडम, कु. गीतांजली हरिदास मॅडम, ओव्हाळ मॅडम, टेके मॅडम, सौ दुर्गा हरिदास मॅडमसह सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी बंधू व विद्यार्थी सहभागी झाले होते.
रॅली नंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्यावतीने स्नेहभोजन व गोड खाऊ वाटप करण्यात आले. शासकीय आदेशानुसार आपटे उपलप प्रशालेने संपूर्ण आठवडाभर शासनाच्या नियमानुसार सर्व उपक्रम राबविले व त्याची शासन दरबारी नोंद केली. याकामी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. धारूरकर सर, पर्यवेक्षक श्री. अभंगराव सर यांनी व्यायामाचे महत्त्व सांगितले. रॅली यशस्वी करण्यात क्रीडाशिक्षक श्री. गुलाखे सर, एन. पी. डांगे सर , सितपराव सर, करकमकर सर, थिटे सर , समीर सवाई सर, अनिल जाधव सर, मुलाणी सर, अजिंक्य हरिदास सर व सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी बंधू श्री. कैकाडी, वाघमारे, सगर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.श्री. खरात सर यांनी निवेदन केले.