होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद

0
मलपे चौक इसबावी येथे कार्यक्रम पाहण्यासाठी महिलांची अलोट गर्दी 

         पंढरपूर (प्रतिनिधी) - सन मराठी चॅनल प्रस्तुत आयोजित करण्यात आलेल्या खास महिलांसाठी 'होम मिनिस्टर' 'खेळ पैठणीचा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास महिला वर्गांने अलोट गर्दी केली होती. सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला.
         महिलांना दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून मनोरंजनाकडे घेऊन जाण्यासाठी खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 
यामध्ये उखाणे, जुन्या पिढीतील महिलांचे बऱ्याच वेळ चालणारे उखाणे तर आधुनिक पद्धतीचे वैचारिक व संस्कृतीचे दर्शन घडवणारे उखाणे स्पर्धा चांगलीच रंगली होती. 
          यावेळी विशेष म्हणजे तळ्यात-मळ्यात हा खेळ तर खूप रंगल्याने महिला भगिनींनी मनसोक्त आनंद लुटला. 
यावेळी मनोरंजन खेळ, विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये विविध बक्षीसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
          या कार्यक्रमाचे सादरीकरण जयंत भालेकर यांनी केले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे नियोजन लोकनेते स्व.आमदार भारत नाना भालके फाउंडेशन यांच्या वतीने व मा.नगरसेवक बालाजी काका मलपे व मित्र परिवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)