शितल शहा यांची आयएमएच्या अध्यक्षपदी यांची निवड

0
         पंढरपूर (प्रतिनिधी) - पंचक्रोशीत लहान मुलांचे देवदूत अशी ख्याती असलेले शहरातील बाल रोग तज्ञ डॉ. शितल के. शहा यांची आज आय एम ए च्या अध्यक्षपदी सर्व डॉक्टरांच्या एकमताने निवड करण्यात आली .
         पंढरपूर शहरात नव्हे तर जिल्ह्यात व महाराष्ट्रात देवदूत म्हणून मानले जाणारे बाल रोग तज्ञ डॉक्टर शितल के. शहा यांची अध्यक्षपदी वर्णी लागली यामुळे शहरातील लोकांतून डॉ. शितल शहा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
         डॉ. शहा यांनी हजारो बालकांना नवजीवन दिले आहे. अगदी सातारा कराड सांगली तसेच कर्नाटक राज्यातून देखील हजारों पालक आपल्या चिमुकल्यांना घेऊन मोठया आशेने पंढरीत येतात आणि आपल मुल वाचलं पंढरीचा जणू पांडुरंगचा पावला या आनंदात घरी जातात. डॉ. शहा यांनी अनेकदा हजारो रुग्णावर मोफत उपचार करुन घरी पाठविले. पैसै नाहित म्हणुन कधी कुणाची अडवणूक केली नाही.
          डॉक्टरसाहेब यांनी करोडो रुपयांची अत्याधुनिक मशिनरी हॉस्पिटलसाठी खरेदी केली आहे. अनेक उपकृत पालक डॉ. शितल शहा यांचा वाढदिवस एखाद्या सणा सारखा साजरा करतात.
        पंढरीच्या वैभवात भर टाकणाऱ्या डॉ. शीतल शहा सरांची आय एम ए च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचेवर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)