पंढरपूर (प्रतिनिधी) - विद्या विकास मंडळ संचलित आपटे उपलप प्रशालेचे वतीने साक्षरता रॅलीचे आयोजन आज दिनांक 8 जुलै 2024 सोमवार रोजी केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता अभियान या उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्हा नियोजन शिक्षण अधिकारी सौ. सुलभा वठारे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये प्रशालेतील जवळजवळ २५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
रॅलीचे उद्घाटन प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. अनिल अभंगराव व मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय धारूरकर यांनी केले. तसेच प्रशालेचा सांस्कृतिक विभागतील श्री.आबासो खरात, सौ.आगावणे, सौ.सर्वगोड, कु. टेके, सौ.कुलकर्णी, कु. हरिदास, कु. ओव्हाळ यांनी सर्व नियोजन केले. शिस्त व क्रीडा विभागाचे श्री. गुलाखे, श्री. कुसुमडे, श्री.भातलवंडे, श्री. हाके, श्री.कुरे, श्री डांगे, श्री.करकमकर, श्री. थिटे, श्री.गंगेकर, श्री.जाधव या शिक्षकांनी केले.
रॅलीसाठी विद्यार्थ्यांनी स्वतः बॅनर तयार केले होते. 'साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा', 'मुलगा मुलगी एक समान शिक्षण त्यांना देऊ छान', 'एज्युकेशन इज पॉवर' 'रीड लीड सक्सिड' अशा घोषणा देण्यात आल्या. भर पावसात व चिखल असूनही विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. आजच्या रॅलीच्या रूपाने खरोखरच नवसाक्षरतेचा श्रीगणेशा झाला.
आज प्रशालेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना साक्षरतेचे महत्व पटवून देण्यात आले व आपापल्या घरातील व परिसरातील व्यक्तींना तुम्ही सुद्धा साक्षर करू शकता व त्याची सुरुवात करायची आहे असे सांगण्यात आले व अतिशय सुंदररित्या रॅलीचे नियोजन झाले. या नियोजनासाठी प्रशालेतील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.