स्वेरीच्या प्रा.बी.डी. गायकवाड व प्रा. एस.एम. खोमणे यांच्या पेटंटला भारत सरकार कडुन मान्यता

0
‘कन्वेअर चेन लिंक मॅन्युफॅक्चरिंग’ यावर केले संशोधन

       पंढरपूर (प्रतिनिधी) - गोपाळपूर  येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाअंतर्गत असलेल्या वर्कशॉपचे इन्चार्ज प्रा.भास्कर धोंडी गायकवाड व प्रा. सचिन महादेव खोमणे यांच्या पेटेंटला भारत सरकारकडून नुकतीच मान्यता मिळाली आहे.
       ‘स्पेशल पर्पज टूल बाय कंबायनींग टू कटिंग ऑपरेशन इन अ सिंगल स्ट्रोक ऑफ प्रेस मशीन टू मॅन्युफॅक्चरिंग कन्वेअर लिंक’ या विषयावर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वर्कशॉपचे इन्चार्ज प्रा.भास्कर गायकवाड व प्रा. सचिन खोमणे यांनी या शोध पेटंटची निर्मिती केली आहे. साखर कारखान्यातील अवजड मशीन्समध्ये असलेल्या ‘कन्वेअर चेन लिंक मॅन्युफॅक्चरिंग’साठी याचा उपयोग होतो. स्वेरीचे प्रा.बी.डी. गायकवाड व प्रा. सचिन खोमणे यांच्या या  पेटंटला भारत सरकार कडुन मान्यता मिळाल्याबद्धल संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सर्व मान्यवर, अधिष्ठाता, विभागप्रमुख व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. संशोधन विभागाच्या प्रगतीचे द्योतक असणाऱ्या या  पेटंट मुळे स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अभियांत्रिकीच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी वर्कशॉपचे इन्चार्ज प्रा.भास्कर गायकवाड व प्रा सचिन खोमणे यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)