पंढरपूर (प्रतिनिधी) - कार्यसम्राट आमदार मा. समाधानदादा आवताडे साहेब यांचे निधीतून मंजूर झालेल्या, सिद्धेवाडी, शिरगाव, तरटगाव,
तसेच माणवाडी, तावशी ता. पंढरपूर येथील रस्त्याच्या कामाचा उद्घाटन समारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मा. श्री. सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी बोलताना त्यांनी, 'आज या रस्त्याच्या खडीकरणाच्या उद्घाटनाला आलो आहे. पुढच्या वेळी सिमेंट काँक्रिट किंवा डांबरी रोडच्या उद्घाटनाला नक्की येवू', अशी ग्वाही दिली. तसेच या भागाच्या संपूर्ण विकासासाठी आम्ही बांधील आहोत. कोणत्याही प्रकारची अडचण असू द्या, हक्काने या, आपण ती सोडवू असे प्रतिपादन केले. तसेच यावेळी युवकनेते आशिष यादव, मि. ग्रामपंचायत सदस्य श्री.अनिल रामचंद्र यादव, कौशिक यादव, समाधान यादव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अनिल यादव यांनी आपल्या मनोगतातून, 'गेल्या कित्येक वर्षांपासून तथाकथित पुढाऱ्यांनी मुद्दामहून प्रलंबित ठेवलेला माणवाडी रस्त्याचा प्रश्न, कार्यसम्राट आमदार मा.समाधान दादांनी सोडविल्याबद्दल परिसरातील नागरिकांच्या वतीने जाहीर आभार व्यक्त केले.
यावेळी युवक नेते आशिष यादव, माजी सरपंच पांडुरंग आसबे, माजी सरपंच भारत रणदिवे, पत्रकार बालम मुलाणी, कौशिक यादव, समाधान यादव, राजेंद्र यादव, औदुंबर यादव, धनाजी यादव, रमेश यादव, शहाजी यादव, डॉ आनंद यादव, दत्ता यादव, दयानंद यादव, नानासाहेब यादव, दीपक यादव, शिवाजी यादव, संभाजी यादव, प्रशांत(पप्पू) यादव, आदिनाथ शिंदे, दादा घाडगे, समाधान घाडगे, अवी शिंदे, कुमार घाडगे, राहुल शिंदे, संभाजी घाडगे, धनाजी माने, काकासाहेब शिंदे, तानाजी वाडेकर, दत्तात्रय शिंदे, नितीन वाडेकर, किसन शिंदे, बाळासाहेब गडदे, बालाजी शिंदे, समाधान वाडेकर, सुभाष घाडगे, उत्तम घाडगे, सिद्धेश्वर घाडगे, उमेश यादव, समर्थ यादव आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.